Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘मेफेड्रोन’ प्रकरणातील पीएसआयचे निलंबन

दोन पोलिस कर्मचार्‍यांना केले बडतर्फ

पुणे : 44 किलो 790 ग्रॅम किलो वजनाचे 44 कोटी 79 लाख 80 हजार रुपयांचे मेफेड्रोन अमली पदार्थासह अटक केलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील एका पोलीस उ

सार्वजनिक बांधकाम विभाग झाला भ्रष्टाचाराचा अड्डा l पहा LokNews24
विकास आणि भुकबळी सोबत अशोभनीय !
लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी ८७ कोटी रुपयांचा धनादेश

पुणे : 44 किलो 790 ग्रॅम किलो वजनाचे 44 कोटी 79 लाख 80 हजार रुपयांचे मेफेड्रोन अमली पदार्थासह अटक केलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. तर, दोन पोलीस कर्मचार्‍यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत.
पिंपळेनिलख रक्षक चौकात हॉटेल कामगाराकडून दोन कोटी रूपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ जप्त केल्यानंतर या प्रकरणात निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याला अटक करण्यात आली आहे. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन कोठून आणले याची विचारणा पोलिसांनी केल्यावर नमामीने निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक शेळके याचे नाव घेतले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. शेळके याचा सहभाग आढळल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्‍यांनी एका महाविद्यालयीन तरुणाला गांजा जवळ बाळगल्याच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून कारागृहात टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून पाच लाखांची खंडणी उकळली. या प्रकरणातील पोलीस कर्मचारी हेमंत गायकवाड आणि सचिन शेजळ यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

COMMENTS