Homeताज्या बातम्याक्रीडा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 23 धावांनी विजय

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत नाणेफेकीचा कौल खूपच महत्त्वाचे असल्याचं दिसून आलं आहे. पण युपी वॉरियर्सला नाणेफेक जिंकून काहीच फरक पडला. प्रथम गोलंद

‘आयसीसी’कडून क्रिकेटमधील सॉफ्ट सिग्नल नियम रद्द
जसप्रीत बुमराह च्या फॅमिलीत आला‌ नवा चिमुकला
आपले किल्ले आपली जबाबदारी : समीर शेख

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत नाणेफेकीचा कौल खूपच महत्त्वाचे असल्याचं दिसून आलं आहे. पण युपी वॉरियर्सला नाणेफेक जिंकून काहीच फरक पडला. प्रथम गोलंदाजी घेऊन बंगळुरुला कमी धावांवर रोखणं जमलं नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांनी सळो की पळो करून सोडलं. सब्भीनेनी मेघना आणि स्मृती मंधाना यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्मृती मंधाना आणि एलिसा पेरी यांनी निर्णायक खेळी करून धावांचा डोंगर रचला. स्मृती मंधाने हीने 50 चेंडूत 80 धावांची खेळी केली. यात 10 चौकार आणि 3 षटकार मारले. तर एलिसा पेरीनेही 37 चेंडूत 58 धावा केल्या यात 4 चौकार आणि 4 षटकार मारले. त्यांच्या या खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 20 षटकात 3 गडी गमवून 198 धावा करता आल्या. युपी वॉरियर्ससमोर विजयासाठी 199 धावांचं आव्हान दिलं होतं. पण युपी वॉरियर्सला 175 धावा करता आल्या आणि 23 धावांनी पराभव सहन करावा लागला.

एलिसा हिली आणि किरण नवगिरेने चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या विकेटसाठी 4.2 षटकात 47 धावांची भागीदारी केली. पण किरण नवगिरे बाद झाली आणि सर्व डावच फिस्कटला. चमारी अथापट्टू 8, ग्रेस हरीस 5, श्वेता सेहरावत 1 धाव करून तंबूत परतले. एलिसा हिलीने एकाकी झुंज सुरु ठेवली होती. 55 धावांवर असताना बाद झाली आणि विजयाचं आणखी कठीण झालं. चेंडू आणि धावांचं अंतर वाढत गेलं आणि पराभव वेशीवर येऊन ठेपले. या विजयानंतर गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ 6 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर युपी वॉरियर्सची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान टिकून ठेवण्यासाठी युपी वॉरियर्सला उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवाला लागणार आहे.

COMMENTS