पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या फेर्या वाढल्या असून, त्यांनी अप्रत्यक्षपणे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना अप
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या फेर्या वाढल्या असून, त्यांनी अप्रत्यक्षपणे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना अप्रत्यक्षपणे यंदा पाडणारच असा इशारा दिला आहे. त्यादृष्टीने बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भावजय असा सामना रंगण्याची शक्यत असतांना दुसरीकडे शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून, राष्ट्रवादीकडून ते लोकसभा लढण्याची शक्यता आहे.
पक्षाकडून करण्यात आलेल्या सर्व्हे मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांचे पारड जड असल्याने त्यांनाच संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच आढळराव पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून त्याची तयारीही झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. राष्ट्रवादी पक्षाकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावावर लवकरच शिक्कमोर्तब होणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील आमदारांची आपल्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असावा ही मागणी केल्याने आता आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेशाची तयारी केल्याची माहिती आहे. बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे या लढणार असल्याचं स्पष्ट आहे. त्यांच्याविरोधात आता अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. बारामतीमध्ये त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर झाली नसली तरीही त्यांचं नाव अंतिम झाल्याची माहिती आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नणंद विरूद्ध भावजया अशीच लढत पाहायला मिळणार आहे. सुनेत्रा पवारांनी बारामतीमध्ये गाठीभेटी घ्यायला सुरूवात केली आहे. राज्यातील हाय होल्टेज निवडणुकींमध्ये शिरूर मतदारसंघाचा समावेश होतो. कारण या ठिकाणचे खासदार अमोल कोल्हे हे शरद पवारांच्या सोबतीने आहेत. त्यामुळे त्यांना यावेळी कोणत्याही परिस्थितीत पाडणार असा निश्चय अजित पवारांनी केला आहे. अजित पवारांनी या मतदारसंघावर दावा केला असून त्या ठिकाणी त्यांनी गाठीभेटीही सुरू केल्या आहेत. शिरूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे शिवाजीराव अढळराव पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. अजित पवारांकडे सध्या तरी कोणताही उमेदवार नसल्याने अढळरावांनी राष्ट्रवादीमध्येर प्रवेश करण्याची तयारी ठेवली आहे आणि त्या माध्यमातून निवडणुकीचीही तयारी सुरू केली आहे. या आधी अढळरावांना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांच्या उमेदवारीचा पत्ता कट केल्याचे सांगितले जात होते. पण आता आढळरावांनी थेट राष्ट्रवादीच्या प्रवेशाची तयारी केल्याने या ठिकाणाहून त्यांचे नाव अंतिम झाल्याचे सांगितले जात आहे.
COMMENTS