मुंबई : राज्यात सतत होणार्या पेपरफुटीवरून विद्यार्थी त्रस्त, सत्ताधारी मात्र फोडाफोडीत व्यस्त, असे फलक हाती घेऊन विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्
मुंबई : राज्यात सतत होणार्या पेपरफुटीवरून विद्यार्थी त्रस्त, सत्ताधारी मात्र फोडाफोडीत व्यस्त, असे फलक हाती घेऊन विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. आमदार रोहित पवारांनी तलाठी भरतीवा आक्षेप घेतल्याप्रकरणी, त्यांनी कोणतेही पुरावे न देता आरोप केल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिल्यानंतर महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्यातील सर्व परीक्षा घोटाळ्यांवर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत महाविकास आघाडीच्या वतीने विधिमंडळाच्या पायर्यांवर आंदोलन करण्यात आले.
मागील काही दिवसांपासून राज्यात पेपरफुटीच्या घटना वाढल्या आहेत. तलाठी भरती प्रकरण ताजे असतानाच बीडमध्ये बुधवारी (पुरवठा निरीक्षण पदाचा पेपर फुटल्याचे समोर आले आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, याच मुद्द्याला हाताशी धरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गुरुवारी (ता.29) विधानभवनाच्या पायर्यांवर लक्षवेधी आंदोलन केलंय. राज्यात सतत होणार्या पेपरफुटीवरून विद्यार्थी त्रस्त, सत्ताधारी मात्र फोडाफोडीत व्यस्त, असे फलक हाती घेऊन विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. सध्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक विविध मु्द्दे बाहेर काढत आहेत. विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरून सरकारवर चांगलंच टीकास्त्र सोडलं आहे. सर्वसामान्य विद्यार्थी मोठी मेहनत करून अभ्यास करतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करून ते पेपर देऊन नोकरीची अपेक्षा ठेवतात. परंतु, पैसे घेऊन परीक्षा पास करून देणारे रॅकेट या महाराष्ट्रात आहे. हे रॅकेट पेपर फोडून ते विद्यार्थ्यांना लाखो रुपयांना विकतात. परिणामी हुशार विद्यार्थी मागे राहतात, असे अंबादास दानवे यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले. उत्तरप्रदेशात देखील अशाच पेपरफुटीच्या घटना वाढल्या होत्या. त्यावर सरकारने तातडीने अॅक्शन घेत तेथील सर्व परीक्षा रद्द केल्या. असंच कडक पाऊल राज्य सरकारने उचलल्याशिवाय पेपरफुटी बंद होणार नाही. मात्र, माझ्याकडे माहिती आहे, की यासाठी सरकारच प्रोत्साहन देत आहे, असा गंभीर आरोपही अंबादास दानवे यांनी केला.
रोहित पवारांनी परीक्षेवर केले होते प्रश्नचिन्ह – तलाठी भरतीसह इतर सर्व भरती प्रक्रियेत काळाबाजार सुरु असून सरकार मुद्दामहून खासगी कंपनीकडून ही प्रक्रिया राबवत आहे. या भरतीचा पेपर अनेक वेळा फुटलेला असूनही चुकीचे घडूनही त्याची पाठराखण सरकार करत अल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. यामध्ये सुधारणा न झाल्यास शिक्षक भरती, प्राध्यापक भरतीतील काळाबाजारा विरोधात आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिला होता.
COMMENTS