कोपरगाव शहर ः विष्णू वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांना कुसुमाग्रज या टोपणनावाने कविता ले
कोपरगाव शहर ः विष्णू वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांना कुसुमाग्रज या टोपणनावाने कविता लेखन केले. त्यांचा जन्म दिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून संबध राज्यात मोठ्या जल्लोषात वेगवेगळे उपक्रम राबवत साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेचे, कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालयातील महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त कलाशिक्षक संदीप दिलीप चव्हाण यांनी तब्बल 16 तास अविरतपणे मेहनत घेत 5 बाय 6 फूट आकाराची कुसुमाग्रज यांची रांगोळी रेखाटत कवी कुसुमाग्रजना आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन केले आहे.
या रांगोळी व कुसुमाग्रज दालनाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन कारभारी आगवन, स्कूल कमिटी सदस्य सांडुभाई पठाण, डॉ सुनील देसाई,प्रमुख वक्ते प्रा.डॉ. शेंडगे बाबासाहेब एस.एस.जी.एम. कॉलेज कोपरगाव, विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर माळी आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी बहुसंख्येने शिक्षण प्रेमी नागरिक ,माजी विद्यार्थी पालक ,विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी रांगोळी बघण्याचा आनंद घेतला. हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक राधाकिसन टाकसाळ ,देविदास झाल्टे ,ललित जगताप, गजानन सांगळे, सिद्धार्थ बर्डे, सुनील पिंपळे सचिन डांगे, अनिल सरोदे , गवनाथ डोखे यांनी बहुमोल मदत केली.
COMMENTS