Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कामगार संघटनांनी पाळला बंद

मार्केट यार्डमध्ये सर्वत्र शुकशुकाट

पुणे : माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे 2018 चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार समिती ब

गायत्री रामनाथ जवादे संस्कृत परीक्षेत प्रथम
रिषभ पंतचे टीमला सरप्राईज 
धनंजय मुंडेंच्या कृषीमंत्री पदाचा लाभ सामान्य शेतकर्‍यांना मिळेल-अमरसिंह पंडित

पुणे : माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे 2018 चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार समिती बनविणे) मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटनांनी सोमवारी बंद पाळला.
बंदमुळे मार्केट यार्डात शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले. राज्यभरातील कामगार संघटनांनी सोमवारी बंद पाळला. राज्यातील बहुतांश बाजार समितीच्या आवारात शेतीमालाची आवक झाली नाही. परराज्यांतील शेतीमालाची आवक सोमवारी झाली. मात्र, पुणे विभागातील शेतकर्‍यांनी शेतीमाल विक्रीस पाठविला नाही. बंदमध्ये श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी दिली. माथाडी कायदा मोडीत काढण्यासाठी माथाडी विधेयक मांडण्यात आलेले आहे. संबंधित विधेयक मागे घेण्यात यावे. माथाडी मंडळात कामगारांच्या मुलांना प्राधान्याने नोकरी द्यावी, तसेच लोकशाही पद्धतीने व्यवस्थित बाजार समित्या सुरू आहेत. त्यांचे केंद्रीकरण करण्याची गरज नसल्याचे कामगार संघटनांकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

COMMENTS