मुंबई ः राष्ट्रवादी कॉगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने थेट पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. अखेर विधिमंडळातील बहुमत लक्षात घेता राष
मुंबई ः राष्ट्रवादी कॉगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने थेट पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. अखेर विधिमंडळातील बहुमत लक्षात घेता राष्ट्रवादी पक्ष आणि घडयाळ चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला नवे चिन्ह आणि नाव देण्याचे निर्देश दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह दिले आहे. या चिन्हाचे अनावरण शरद पवार गटाकडून रायगडावर करण्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह बहाल केले आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाकडे हे चिन्ह असणार आहे. दरम्यान या पक्षचिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार, प्रसार व्हावा यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 24 फेब्रुवारी रोजी या चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात येणार आहे. त्यासाठी खास कार्यक्रमाची तयारी शरद पवार गटाकडून केली जात आहे. शरद पवार गटाच्या अधिकृत एक्स खात्यावर या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे एक खास टिझर प्रदर्शित करण्यात आले आहे. किल्ले रायगडावर हा कार्यक्रम होणार आहे. ‘शरद पवारांच्या साथीने विकासाचे रणशिंग फुंकले जाणार आहे,’ असे या पोस्टमध्ये म्हणण्यात आले आहे. शरद पवार गटाच्या एक्स खात्यावर शेअर करण्यात आलेल्या टिझरमध्ये पक्षचिन्ह अनावरण सोहळ्याविषयी अधिक माहिती देण्यात आली. या टिझरला खासदार अमोल कोल्हे यांचा आवाज आहे. आता अवघा देश होणार दंग, शरद पवार यांच्या साथीने फुंकले जाणार विकासाचे रणशिंग! ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ला मिळालेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या पक्ष चिन्हाचाअनावरण सोहळा 24 फेब्रुवारी 2024 रोजी किल्ले रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे. चला, छत्रपती शिवरायांच्या साथीने तुतारीचा नाद दाही दिशा घुमवूया,’ असे या पोस्टमध्ये म्हणण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शरदपवार गटाचे अनेक नेते, कार्यकर्ते हजेरी लावण्याची शक्यता आहे.
COMMENTS