Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोटच्या मुलाचा जन्मदात्यांवर कुर्‍हाडीने हल्ला

चंद्रपूर ः चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील लोणी येथील घरातीलएका खोलीत बंद करून मुलानेच आई- वडिलांवर कुर्‍हाडीचे घाव घातले. यात आईचा जागीच

Nashik : भुजबळ साहेबांच्या प्रयत्नाने दिंडोरीतील पर्यटन प्रकल्पामुळे मिळणार विकासाला चालना (Video)
मालवाहू ट्रक आणि ऑटोची समोरासमोर धडक चार जणांचा जागेवरच मृत्यू
संजय राऊतांच्या ईडी कारवाई संदर्भात मनसे प्रवक्ते प्रकाश महाजनांचा गौप्यस्फोट.

चंद्रपूर ः चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील लोणी येथील घरातीलएका खोलीत बंद करून मुलानेच आई- वडिलांवर कुर्‍हाडीचे घाव घातले. यात आईचा जागीच मृत्यूझाला तर वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना बुधवारी घडली. कमला पांडुरंग सातपुते असे मृत आईचे तर पांडुरंग सातपुते असेगंभीर जखमी वडिलांचे नाव आहे. डोक्याला गंभीर इजा झाल्याने पांडुरंग सातपुते यांच्यावर कोरपना येथे ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना चंद्रपूर येथे हलवण्यात आले. आरोपी मुलगामनोज पांडुरंग सातपुते (45) याला अटक करण्यात आली आहे.

COMMENTS