Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपुरात माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला

नागपूर ः आमदार, नगरसेवक यांच्यावर हल्ला होत असल्याच्या घटना घडत असतांना आणि मुंबई-पुण्यात फेब्रुवारी महिन्यात तर गोळीबार आणि हल्ला झाल्याच्या अने

जामखेडमध्ये व्यापार्‍यावर जीवघेणा हल्ला
शिवसेना शहर प्रमुखावर चाकू आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला
‘शिवसेनेत खूप उडतोयस’ असं म्हणत उपशहर प्रमुखावर जीवघेणा हल्ला !

नागपूर ः आमदार, नगरसेवक यांच्यावर हल्ला होत असल्याच्या घटना घडत असतांना आणि मुंबई-पुण्यात फेब्रुवारी महिन्यात तर गोळीबार आणि हल्ला झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता नागपूरमध्येही माजी नगरसेवकावर हल्ल्या झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दिलीप बांडेबुचे बुधवारी रात्री त्यांची जिम बंद करून अकरा वाजताच्या सुमारास नेहरूनगर भागातून जात असताना, त्यांच्यावर आठ ते दहा अज्ञात लोकांनी तलवार, हॉकी स्टिक आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला. अज्ञात लोकांनी केलेल्या जबर मारहाणीत दिलीप बांडेबुचे गंभीर जखमी झाले आहेत.

COMMENTS