Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट

25 फेबुवारीपासून पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

पुणे ः वातावरण बदलामुळे निसर्गाचे चक्र बदलत असून, या बदलत्या हवामानामुळे शेतकर्‍यांचे सर्वाधिक नुकसान होतांना दिसून येत आहे. भारतीय हवामान खात्या

कुंकूलोळ कुटुंबियांनी उभारले स्वखर्चातून बस निवारा शेड
यवतमाळमध्ये नगरसेवकाची हत्या
‘वंचित‘चा स्वबळाचा नारा !

पुणे ः वातावरण बदलामुळे निसर्गाचे चक्र बदलत असून, या बदलत्या हवामानामुळे शेतकर्‍यांचे सर्वाधिक नुकसान होतांना दिसून येत आहे. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पाऊसाचा इशारा दिला आहे. या अवकाळी पावसाचा फटका राज्यातील आठ जिल्ह्यांना बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
येत्या 25 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याआधी मात्र हवामान कोरडे राहील. 25 फेब्रुवारीला राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांच्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या रविवारी विदर्भतील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या आठ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एक किंवा दोन ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे विदर्भातील यासंबंधित जिल्ह्यातील शेतकर्‍यांना रब्बी हंगामातील पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. जानेवारीच्या अखेरीस किमान तापमानात घट झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये पुन्हा हवामान बदलले. फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात विदर्भ तसेच मराठवाड्यात गारपीटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीटीसह झालेल्या जोरदार पावसाने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता.

COMMENTS