Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांना धमकी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष, माजी महापौर प्रशांत जगताप यांना धमकीचा संदेश पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याब

पुन्हा एकदा होणार काँग्रेची ‘भारत जोडो यात्रा
ध्वजरोहनने शनिशिंगनापुरात शनिजयंती उस्तवा सुरुवात
मतदान रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष, माजी महापौर प्रशांत जगताप यांना धमकीचा संदेश पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत जगताप यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली असून, धमकी देणार्‍या आरोपीला अटक करण्यात यावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर जगताप ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह अजित पवार यांच्याकडे राहणार असल्याचा निकाल देण्यात आल्यानंतर जगताप यांनी टीका केली. गेल्या चार दिवसांपासून जगताप यांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून धमकीचे संदेश पाठविण्यात येत आहेत. राजकीय भाष्य केल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी जगताप यांना देण्यात आली आहे. जगताप यांना धमकीचा संदेश पाठविण्यात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. मला गेल्या चार दिवसांपासून धमकीचा संदेश अनोळखी मोबाइल क्रमांकावरून पाठविण्यात येत आहे. मी राजकीय परिस्थितीवर टीका केली, तसेच आंदोलन केल्याने मला धमकावले जात आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा सखोल तपास करून धमकी देणार्‍यास अटक करावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.

COMMENTS