Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात खवले मांजराची तस्करी

पुणे : जुन्नर वन विभागातील घोडेगाव वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ घोडेगाव नियतक्षेत्र घोडेगाव येथे खवले मांजरांची तस्करीचे प्रकरण उघड झाले आहे. या प्

नाशिक शिक्षक मतदार संघ 93.48 टक्के ; कोपरगाव तालुक्यात 93.58 टक्के मतदान
माळीवाडा बस स्थानकातून दोन वृद्ध महिला बेपत्ता
अवकाळी आणि तापमानवाढ

पुणे : जुन्नर वन विभागातील घोडेगाव वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ घोडेगाव नियतक्षेत्र घोडेगाव येथे खवले मांजरांची तस्करीचे प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आली आहे. खवले मांजर (इंडियन पँगोलीन) हा शेड्युल 1 मध्ये येत असून त्याची तस्करी उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. रोहीदास पंढरीनाथ कुळेकर, कांताराम सखाराम वाजे, सखाराम बबन मराडे, सागर पुनाजी मेमाणे, जालिंदर कान्डु कशाळे, गीता नंदकुमार जगदाळे, शांताराम सोमनाथ कुडेकर अशी अटक करण्यात आलेलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपीना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोडेगाव यांच्यासमोर हजर केले असता त्यांना वनकोठडी देण्यात आली आहे.

COMMENTS