नाशिक - छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विभागीय आय
नाशिक – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अपर आयुक्त निलेश सागर , उपायुक्त (सा. प्र.) श्रीमती डॉ राणी ताटे, उपायुक्त (रोहयो ) प्रज्ञा बडे मिसाळ,उपआयुक्त (भुसुदार) विठ्ठल सोनवणे , महसूल प्रबोधिनीच्या संचालक जयरेखा निकुंभ, उपायुक्त (विकास) उज्वला बावके, उपायुक्त नगर पालिका संजय दुसाने, सहायक संचालक (लेखा) जनार्दन सहारे, तहसीलदार पल्लवी जगताप, कुंदन हिरे, मिलिंद कुलकर्णी, मिनाक्षी राठोड व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त कार्यलयातील कर्मचारी अरुण सुकटे यांचे चिरंजीव कु आकाश अरूण सुकटे याने छत्रपती शिवाजी महाराजांची केलेली भूमिका विशेष उल्लेखनीय होती. तसेच अरुण सुकटे यांनी शिवगर्जने विषयी माहिती दिली. कोठारी कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी राज्यगीत व शिवाजी महाराजांच्या पोवाड्याचे गायन केले. आयुक्त कार्यालयातील महसूल सहायक समाधान दळवी यांची पत्नी दीपाली दळवी यांनी मनमोहक रांगोळीतुन महाराजांची छबी व राजमुद्रा रेखाटली. विभागीय आयुक्त कार्यालयातील कार्यक्रमानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
COMMENTS