Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सकल मराठा समाजाने पुकारलेल्या पाथर्डी बंदला शहर आणि तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद

पाथर्डी प्रतिनिधी - सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पाथर्डी बंदच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर आज पाथर्डीत

परीक्षांचे दिवस असल्याने ध्वनी प्रदूषण थांबवा
मानवी तस्करीत अडकलेल्या पीडितांच्या पुनर्वसनासाठी वकिलांची भूमिका महत्वाची l LokNews24
कर्जतमध्ये संगीतमय कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम उत्साहात

पाथर्डी प्रतिनिधी – सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पाथर्डी बंदच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर आज पाथर्डीत कडकडीत बंद पाळत शहरातील आणि तालुक्यातील सकाळी दुकाने बंद ठेवण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मुद्दावर अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या  उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी सकल मराठा समाज्याच्या वतीने शनिवारी पाथर्डीं बंदची हाक देण्यात आली होती.आज सकाळी शहरातील स्व. वसंतराव नाईक चौकात मराठा तरुणांनी एकत्र येत सर्वांनी बंद पाळण्याचे आवाहन केले. व शहरातुन जरांगे यांच्या समर्थनार्थ घोषणा देत रॅली काढली.नाईक चौकात या बंदमध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करण्यात येवुन या निषेध रॅलीचा समारोप झाला.

यावेळी विष्णूपंत अकोलकर, बंडूशेठ बोरुडे, सचिन वायकर,अनंत ढोले, दत्ता पाठक, सुनील कदम, उद्धव माने, बबन सबलस, डॉ.रामदास बर्डे, बबलू खोर्दे, अर्जुन शिंदे, रामेश्वर शिवणकर, बबलू वावरे,नामदेव लबडे,सोमनाथ माने,संजय बोरुडे,सोमनाथ भापकर,पांडुरंग काकडे,प्रताप एकशिंगे.

बाबासाहेब चितळे,सोमा माने,बबलू खोरदे आदींसह  मराठा तरुण उपस्थित होते. बंदच्या पार्श्वभूमीवर आज शहरातील हॉटेल, पान टपरी, फळाचे गाड्या सह भाजी बाजार व मुख्य बाजारपेठेतील सर्वच व्यवहार बंद होते.या बंद मधुन अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा यांना वगळण्यात आले होते. या अत्यावश्यक सेवा वगळता शहर मात्र कडकडीत बंद होते.  गजबजलेल्या चौकात सुद्धा शुकशुकाट पाहावयास मिळाला.

COMMENTS