Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगे यांची प्रकृती आणखीनच खालावली

जालना प्रतिनिधी - मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अन्न त्याग आंदोलन सुरू केलं आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांनी पाण

निवडणूकीचे संकेत देणारा अर्थसंकल्प ! 
महाविकास आघाडीतच रस्सीखेच सुरू
Mumbai : मूल होत नसल्याने भाचीला पळवलं, मावशीसह नवऱ्यालाही अटक | Loknews24

जालना प्रतिनिधी – मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अन्न त्याग आंदोलन सुरू केलं आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांनी पाणी सुद्धा पिणं बंद केलं आहे. त्यामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्त येत आहे. त्यांनी सलाईनही लावण्यास नकार दिला आहे. उपचार घेण्यास मना केलं आहे. त्यामुळे सर्वांची धाकधूक वाढली आहे. मनोज जरांगे यांना सर्वजण पाणी तरी प्या असा आग्रह करत आहेत. एका चिमुकलीनेही जरांगे काका पाणी प्या, अशी विनवणी केली आहे. पण जरांगे कुणाचेही ऐकेनात. कुणालाही प्रतिसाद देत नाहीत. आधी अध्यादेशाची अंमलबजावणी करा, मगच पाणी घेतो असं त्यांनी म्हटलंय. मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या सहा दिवसांपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे. सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी जरांगे यांनी उपोषण सुरू केलं आहे. त्यांनी अन्न त्याग सुरू केला आहे. पाणी पिणंही बंद केलं आहे. त्यामुळे जरांगे अशक्त झाले आहेत. त्यांना थकवा जाणवत आहे. त्यांनी पाणी प्यावं म्हणून लोक विनवणी करत आहेत. पण जरांगे पाटील ऐकायला तयार नाहीत. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही, तोपर्यंत पाण्याच्या थेंबालाही हात लावणार नाही असं जरांगे पाटील यांनी सांगितलं

COMMENTS