मुंबई ः भाजपने द्रौपदी मुमू यांच्यापूर्वी मला राष्ट्रपतीपदाचा प्रस्ताव दिला होता, मात्र आपण तो प्रस्ताव फेटाळून लावल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन
मुंबई ः भाजपने द्रौपदी मुमू यांच्यापूर्वी मला राष्ट्रपतीपदाचा प्रस्ताव दिला होता, मात्र आपण तो प्रस्ताव फेटाळून लावल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत असणार्या वैचारिक मतभेदांमुळे मी त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला असेही आंबेडकर म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना आंबेडकरांनी हा दावा केला आहे.
यावेळी बोलतांना आंबेडकर म्हणाले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापूर्वी भाजपकडून मला राष्ट्रपतीपदासाठी विचारणा झाली होती. तुम्हाला राष्ट्रपती व्हायला आवडेल का? असा सवाल त्यांनी केला होता. पण मी तुम्ही मला राजकारणातून बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहात का? असा उलट सवाल करत त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला. 2024 मध्ये सर्व पक्षांनी चांगली कामगिरी केल्यास चित्र वेगळे दिसू शकते. मी तुमच्या विरोधात आहे हे लक्षात घ्या, असे मी राष्ट्रपतीपदासाठी विचारणा करणार्या भाजप नेत्यांना सांगितले. राष्ट्रपतीपदाची ऑफर नेमकी कुणी दिली? कोणत्या पातळीवर याविषयी चर्चा सुरू होती? असे विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी तुम्ही हे प्रश्न भाजप नेत्यांना विचारा, असे प्रत्युत्तर दिले. मी माझा सोर्स सांगणार नाही. ज्या रस्त्याने जायचे नाही, त्याचा विचार आम्ही करत नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीने कितीही आमच्या विरोधात भूमिका घेतली, ते आमची चळवळ मोडून काढण्यापर्यंत पोहोचले, तरी आम्ही भाजपसोबतच हातमिळवणी केली नाही हीच वस्तुस्थिती आहे, असेही आंबेडकर यावेळी मुलाखतीत बोलताना म्हणाले.
COMMENTS