Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकचे माजी आमदार बबनराव घोलप शिंदे गटाच्या वाटेवर 

नाशिक - महाविकास आघाडीला दररोज नवनवे धक्के बसत असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता ठाकरे गटालाही नाशिकमधून मोठा

छत्रपती शाहू महाराज स्मृतीशताब्दी निमित्त !
चेन्नईत कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पाहून चाहत्यांचा जल्लोष
अनैतिक संबंधाच्या संशयावरून मुंडके व धड वेगवेगळे करून तरुणाचा खून | LOKNews24

नाशिक – महाविकास आघाडीला दररोज नवनवे धक्के बसत असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता ठाकरे गटालाही नाशिकमधून मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नगर दौर्‍यावर असताना घोलप यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. अद्याप त्यांनी पक्षाला सोडचिठठी दिली नसली तरी येत्या एक दोन दिवसांत भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

घोलप हे गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत नाराज आहेत. आपल्याला डावलले जात असल्याची त्यांची भावना आहे. घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. काही दिवसांपूर्वी शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. शिर्डीतून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असल्याने बबनराव घोलप नाराज आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात नव्या संपर्कप्रमुखांची निवड करताना आपल्याला विचारात घेतले नाही अशी नाराजीही त्यांनी बोलून दाखवली. यापुर्वीही घोलप यांनी मुख्यमंत्रयांची भेट घेतली होती.

सोमवारी उध्दव ठाकरे नगर दौऱ्यावर असतांना घोलप यांनी मुंबईत सह्याद्री विश्रामगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेत चर्मकार महामंडळ आणि चर्मकार समाजाच्या विविध मागण्याबाबत चर्चा करण्यात आली. वीस सदस्यांच्या या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत विविध मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईत गोवंडी येथे संत रोहिदास चर्मकार प्रशिक्षण व लघुउद्योग केंद्राची निर्मिती करण्याचे ठरले. एकूणच या सर्व घडामोडीतून घोलपांच्या राजकीय वाटचालीविषयी तर्क वितर्क लढवले जात आहे.

कोण आहेत घोलप ? – नाशिकच्या देवळाली मतदारसंघातून पाचवेळा आमदार राहिलेले बबनराव घोलप हे १९९५ च्या युती सरकारच्या काळात मंत्री होते. त्यांनी नाशिक जिल्ह्यात ३० वर्षे एकहाती वर्चस्व ठेवत शिवसेनेला ताकद दिली. शिवसेना फुटल्यानंतरही त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले होते. आपल्या लेकीला उमेदवारी देण्याचे ते स्वप्न पाहत होते, पण भाऊसाहेब वाकचौरे पक्षात आल्याने ते अस्वस्थ आहेत.

COMMENTS