नाशिक : भारतात मधुमेहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे यासाठी जनतेमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या अनुषंगाने महाराष्ट्र मधुमेह संघटनेतर्फे मधुम

नाशिक : भारतात मधुमेहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे यासाठी जनतेमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या अनुषंगाने महाराष्ट्र मधुमेह संघटनेतर्फे मधुमेहावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र मधुमेह संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर नारायण देवगावकर यांनी दिली.
शुक्रवार दि.16 फेब्रुवारी 2024 रोजी शंकराचार्य न्यास संकुल गंगापूर रोड नाशिक येथे दुपारी 5 वाजता आयोजित करण्यात आलेल्या ” मधुमेह उपचार आणि मधुमेहाचे दुष्परिणाम” या विषयांवर आधारित मधुमेहासोबत आनंदी जगण्याची गुरुकिल्ली या चर्चासत्रात मुंबई येथील प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ. विजय पनिकर, पुणे येथील डॉ. शैलेजा काळे, नाशिक येथील किडनी विकार तज्ञ डॉ. पार्थ देवगावकर, मधुमेह तज्ञ डॉ. नारायण देवगावकर यांचे माहितीपूर्ण चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असुन मुलाखत डॉ. समीर चंदात्रे घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र मधुमेह संघटना, प्रौढ नागरिक मित्र मंडळ, कुसुमाग्रज हास्य क्लब यांच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS