अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची अतिभयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.कोपरगाव तालुक्यातही दिवसेंदिवस कोरोनाचे प्रमाण वाढत असून कोपरगाव तालुक्यातील किराणा व्यापाऱ्यांनी शुक्रवार दि.१६ एप्रिल २०२१ पासून दुपारी ४.०० वाजेपासून ते सोमवार दि.१९ तारखेपर्यंत स्वतःची दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवणार असून त्याप्रमाणे पुढील प्रत्येक आठवड्यात देखील मंगळवार, बुधवार व गुरुवार हे तीन दिवस सकाळी ८ ते दुपारी २.०० पर्यंतच दुकाने उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कोपरगाव किराणा मर्चंट्स असोसिएशन चे अध्यक्ष राजकुमार बंब यांनी दिली.
कोपरगाव प्रतिनिधी- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची अतिभयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.कोपरगाव तालुक्यातही दिवसेंदिवस कोरोनाचे प्रमाण वाढत असून कोपरगाव तालुक्यातील किराणा व्यापाऱ्यांनी शुक्रवार दि.१६ एप्रिल २०२१ पासून दुपारी ४.०० वाजेपासून ते सोमवार दि.१९ तारखेपर्यंत स्वतःची दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवणार असून त्याप्रमाणे पुढील प्रत्येक आठवड्यात देखील मंगळवार, बुधवार व गुरुवार हे तीन दिवस सकाळी ८ ते दुपारी २.०० पर्यंतच दुकाने उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कोपरगाव किराणा मर्चंट्स असोसिएशन चे अध्यक्ष राजकुमार बंब यांनी दिली.
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांचे अध्यक्षतेखाली समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व. यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री. विजयराव वहाडणे, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले, शिवसेनेचे कलविंदर दडीयाल, भाजपचे कोपरगाव शहराध्यक्ष दत्ता काले, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तुषार पोटे, मनसेचे संतोष गंगवाल हे उपस्थित होते. तसेच व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष नारायणशेठ अग्रवाल, सदस्य श्री दिपकशेठ अग्रवाल, किरण शिरोडे उपस्थित होते.
याबाबत पुढे बोलतांना व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा म्हणाले कि, ‘कोपरगाव शहरातील किराणा मर्चंट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतील निर्णयान्वये कोरोना आटोक्यात आणण्यास प्रशासनास सहकार्य करावे, तसेच बंदच्या कालावधीमध्ये शहरातील नागरिकांना मर्यादित स्वरुपात, मर्यादित वस्तुंतर्गत जीवनावश्यक डाळ, तांदूळ, तेल, तूप, चहा, साखर, मीठ या वस्तूंची गरज भासल्यास समता पतसंस्थेने दिलेल्या ७७२२०१०२२२ या हेल्पलाईन वर संपर्क साधल्यास या जीवनावश्यक वस्तू घरपोहोच सेवा देण्याची तयारी समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दर्शविली आहे. कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनच्या बैठकीत झालेला हा निर्णय शिर्डीचे प्रांताधिकारी श्री.गोविंद शिंदे, कोपरगाव नगरपालिकेचे मुख्यादिकारी श्री.प्रशांत सरोदे यांना माहिती दिली असता त्यांनी देखील या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले.
COMMENTS