Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर अशोक चव्हाणांच्या हाती भाजपचा झेंंडा

भाजप नेते फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश

मुंबई ः काँगे्रसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँगे्रसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी त्यांनी उपम

धाडसी निर्णय घेतला नसता तर विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो – अशोक चव्हाण
जाहीर सभेत अशोक चव्हाणांची तुफान डायलॉगबाजी
मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांच्यात खलबते

मुंबई ः काँगे्रसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँगे्रसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले की, आता मी माझ्या राजकीय कारकिर्दीची नवी सुरुवात करतो आहे. काँग्रेस सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. यासाठी खूप विचार करावा लागला. काही गोष्टी देशासाठी आणि राज्यासाठी चांगल्या होत असतील तर निर्णय घ्यावा असे वाटले. मी पक्षासाठी योगदान दिले. मी पार्टी वाढवण्यासाठी काम केले त्यामुळे टीका करणे योग्य नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले. आम्ही विरोधात आणि सत्तेत असताना देखील आमचे राजकारणापलिकडे संबंध होते. विकासाची आम्ही नेहमी साथ दिली.  38 वर्ष काँग्रेसमध्ये राहून नवीन सुरुवात करत आहे. राज्यासाठी काम करताना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिली. विकासाला सोबत घेऊन आम्ही एकत्र काम करत आहोत. देवेंद्र फडणवीस नेहमी सकारात्मक आम्हाला साथ दिली. मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेन. राज्यात भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करून. मी व्यक्तिगत टीका कुणावर करणार नाही. मी कुणावर दोषारोप केलेले नाही आणि करणार नाही. पक्ष प्रवेशाची फी देखील मी बावनकुळे यांना दिलेली. पंतप्रधान मोदी सबका साथ सबका विकास करत आहेत. मी कधीही कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही आणि करणार नसल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले.  यावेळी बोलतांना भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे की, महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेतृत्व आमच्याकडे आले आहे. देशाची लोकसभा आणि विधानसभा गेली अनेक वर्षे ज्यांनी गाजवली. विविध मंत्रिपदे ज्यांनी भुषवली आणि दोनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली असे अशोक चव्हाण भाजपत प्रवेश करत असल्याचा आपल्याला आनंद आहे.

चव्हाणांमुळे महायुतीची ताकद वाढली ः फडणवीस – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात महायुतीची शक्ती वाढली आहे. अशोक चव्हाण यांनी पदाची अपेक्षा नसल्याचे सांगितले असून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात मुख्य प्रवाहात काम करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच अशोक चव्हाण हे राष्ट्रीय उंचीचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या संदर्भातील सर्व महत्वाचे निर्णय हे वरिष्ठ पातळीवर घेतले जातील असा उल्लेखफडणवीस यांनी केला आहे. तसेच विरोधकांना पक्ष, नेते सांभाळता येत नाहीत. याबाबत त्यांनी आत्मचिंतन करावे असे म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.

अशोक चव्हाण यांना मिळणार राज्यसभेची उमेदवारी? – अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का? असा प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशोक चव्हाण यांची मदत कुठे घ्यायची हे आम्हाला माहिती आहे. अशोक चव्हाण यांचा अनुभव राहिलेला आहे त्याचा आम्ही फायदा घेऊयात. राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा आमचे केंद्र करेल, असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे आज बुधवारी अशोक चव्हाण आपली उमेदवारी भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

COMMENTS