विळद घाटातील अपघातात  जळगावच्या दाम्पत्याचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विळद घाटातील अपघातात जळगावच्या दाम्पत्याचा मृत्यू

नगर मनमाड महामार्गावरील नगरपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावरील विळद घाट येथे रविवारी दुपारच्या सुमारास कंटेनरने चार चाकी वॅगन आर या गाडीला जोरदार धडक देऊन ते कंटेनर त्या गाडीवर पडल्याने गाडीचा चक्काचूर होऊन जळगावचे पाटील दाम्पत्य मृत्युमुखी पडले.

श्री संत जगनाडे महाराज ट्रस्टची सामाजिक बांधिलकी आदर्शवत ः  आ. आशुतोष काळे
युवकांनी लोकशाही बळकट व समृद्ध करावी : तहसीलदार नानासाहेब आगळे
नगर अर्बन बँकेची अखेर निवडणूक होणार ; चिन्ह वाटप जाहीर, बँक बचाव पॅनेलचा बिनविरोध सूर बासनात

अहमदनगर/प्रतिनिधी – नगर मनमाड महामार्गावरील नगरपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावरील विळद घाट येथे रविवारी दुपारच्या सुमारास कंटेनरने चार चाकी वॅगन आर या गाडीला जोरदार धडक देऊन ते कंटेनर त्या गाडीवर पडल्याने गाडीचा चक्काचूर होऊन जळगावचे पाटील दाम्पत्य मृत्युमुखी पडले. या अपघातात रवींद्र किसन पाटील (वय 45) व मनीषा रवींद्र पाटील (वय 42, दोघेही राहणार पाचोरा, जिल्हा जळगाव) अशी मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. 

    या अपघातातून त्यांचा नऊ मुलगा आश्‍चर्यकारकरित्या बचावला. या घटनेसंदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या अपघातानंतर नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. रविवारी दुपारी तीनच्या सुमाराला जळगाव येथील पाटील कुटुंब हे चारचाकी वाहनातून पुण्याकडे जात होते. नगर-मनमाड महामार्गावरील विळद घाटात समोरून मोठा कंटेनर येत होता. कंटेनरच्या चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्यामुळे तो पाटील यांच्या गाडीला घासत गेला व नंतर उलटून या गाडीवरच पडला. या अपघातामध्ये पाटील कुटुंबीय जागीच ठार झाले. या घटनेची माहिती विळद येथील ग्रामस्थांकडून पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाटील दाम्पत्याला जिल्हा रुग्णालयांमध्ये नेल्यानंतर त्यांना तेथे मृत घोषित करण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे तर त्याचा साथीदार हा या अपघातामध्ये जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. या अपघाताची माहिती पाटील यांच्या पाचोरा येथील कुटुंबीयांना देण्यात आलेली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यांमध्ये अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मुलाला बाहेर काढले सुख़रूप

पाटील यांच्या चारचाकी वाहनावर कंटेनर पडल्याने या गाडीचा चक्काचूर झाला. मात्र, आत लहान मुलगा अडकला होता. या अपघाताची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पोलिस कॉन्स्टेबल कल्पना अवसरे यांनी तात्काळ आपल्या पथकासह या ठिकाणी जाऊन अपघातातील त्या नऊ वर्षीय मुलाला सुखरूपपणे बाहेर काढले. ग्रामस्थांची सुद्धा मदत त्यांना या वेळी झाली. या अपघातात मुलाच्या डोक्याला जखम झाली असून त्याला पुढील उपचारासाठी अपघात स्थळापासून जवळच असलेल्या डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असून, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

COMMENTS