Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपरी, पुणे यांचे नाशिक मध्ये बाह्यरुग्ण विभाग सुरू  

नाशिक -  हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, मूत्रपिंड आणि यकृत अतिगंभीर आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपरी, पुण

पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी बलाढ्य तर विकास आघाडीसमोर ऐक्याचे आव्हान
भोंग्यासंदर्भात एकत्रित धोरण ठरवा
राहाता तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीवर विखे समर्थकांचा झेंडा

नाशिक –  हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, मूत्रपिंड आणि यकृत अतिगंभीर आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपरी, पुणे यांचे नाशिक मधील मेडिलिव्ह हॉस्पिटल (डॉ. शरद देशमुख), डॉ. सचिन दंडे यांचे क्लिनिक, डॉ. नितीन बोरसे, मॅगनम हॉस्पिटल (डॉ. मनोज चोपडा), विजन हॉस्पिटल (डॉ. विनोद विजन), हृदयस्पर्श मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (डॉ. गिरीश काळे), डॉ. मुथा हॉस्पिटल, गांगुर्डे हॉस्पिटल येथे बाह्यरुग्ण विभाग सुरु होत आहे. या सुविधेमुळे तज्ज्ञांचे समुपदेशन व मार्गदर्शन मिळणे शक्य होईल. या ओपीडी द्वारे नाशिक आणि आसपासच्या भागातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे. तसेच ऑक्सिजनवर अवलंबून किंवा अतिगंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर काहीवेळा अवयव प्रत्यारोपण सुद्धा करावे लागतात त्याकरिता महाराष्ट्रातील रुग्णांना हैदराबाद, दिल्ली, चेन्नई मध्ये जावून उपचार घ्यावे लागतात ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोन्ही मोठ्या प्रमाणात खर्च होतो. परंतु पुण्यातील डीपीयू हॉस्पिटलमध्ये आता ह्या प्रत्यारोपणाच्या सर्व सेवा सुविधा, अनुभवी कुशल डॉक्टरांच्या टीम उपलब्ध असल्याने वेळ व पैश्याची बचत देखील होईल. त्यामुळे नाशिक परिसरातील रुग्णांना याचा लाभ होणार आहे.

फुप्फुस संबंधी दुर्धर, बऱ्या होऊ न शकणाऱ्या, कोवीडमुळे लंग फ्रायबोसीस झालेल्या, अंथरुणावर खिळलेले तसेच ऑक्सिजनवर अवलंबून असणाऱ्या रुग्णांसाठी आवश्यक उपचार प्रक्रिया व फुप्फुस किंवा हृदय प्रत्यारोपण सुविधा तसेच स्वादुपिंड, मूत्रपिंड आणि यकृत आजारांबाबत देखील मार्गदर्शन व प्रत्यारोपण सेवांची लोकांना माहिती व्हावी आणि त्याचा प्रसार होणे गरजेचे आहे. कारण अशा गंभीर आजारांच्या उपचारांसाठी नाशिक परिसरातील किंवा इतर महाराष्ट्रातील रुग्ण प्रामुख्याने हैदराबाद, दिल्ली, चेन्नई मध्ये जावून उपचार घेतात. त्यासाठी अनेक महिने प्रतीक्षा यादीत नाव नोंद करून वाट पाहावी लागते, त्यामुळे उपचार करण्यात उशीर होऊन खर्चही अधिक होतो. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. 

काही परिस्थितीमध्ये अतिगंभीर रुग्णांना ऑक्सिजन व काही रुग्णांना डायलिसीवर अवलंबून असलेल्या रुग्णांना बाह्यरुग्ण विभागाद्वारे तज्ज्ञांचे समुपदेशन व मार्गदर्शन मिळणे शक्य होईल रुग्णाचे आरोग्यहित साध्य व्हावे याचाच विचार करून पुण्यातील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल द्वारे नाशिक विभागामधील रुग्णांसाठी ओपीडी सेवा सुरु करणार आहे. त्यामुळे सर्व गंभीर आजारांवर डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथे उपचार उपलब्ध असल्याने या सेवेचा लाभ नाशिक परिसरातील जनतेला ही घेता येणार आहे.

डॉ. पी.डी. पाटील, कुलपती डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे, म्हणाले, “आरोग्य सेवेतील आधुनिक तंत्रज्ञानाने नाविन्यपूर्ण संशोधनावर आणि प्रक्रियांवर आम्ही नेहमीच भर देत असतो, ज्यामुळे त्याचा अतिगंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना फायदा होतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण परिसरातील जनतेला विविध प्रकारच्या  आजारांवर सुलभ आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने आणखी काही शहरांमध्ये विविध ठिकाणी बाह्यरूग्ण विभाग सुरु करण्याचा आमचा मानस आहे. 

डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र- कुलपती, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ),पिंपरी, पुणे, म्हणाल्या, “महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहचून हृदय विकार, फुप्फुस प्रत्यारोपण सारख्या गंभीर आजारांवर जनतेला अधिकाधिक दर्जेदार आणि सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी याच उद्दिष्टाने ही ओपीडी सुरु करण्यात आली आहे. आम्ही आरोग्यसेवेमध्ये सतत नवीन आणि आधुनिक अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे रुग्णसेवा जास्तीत जास्त सुरक्षित करण्यासाठी सतत कार्यशील आहोत.”

डॉ. यशराज पाटील, विश्वस्त व खजिनदार, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे म्हणाले, “वैद्यकीय सेवेचे विस्तार होणे काळाची गरज आहे. त्यामुळे, अशा विभागवार ओपीडीच्या माध्यमातून रुग्णाचे आरोग्य हित साध्य व्हावे या दिशेने आम्ही कार्यरत आहोत.   महाराष्ट्राच्या जनतेला जागतिक दर्जाची वैद्यकीय सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत उत्तम तसेच जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

 डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक ऑपरेशन्स डॉ. संजय पठारे यांनी संबोधीत केले. यावेळी हृदयरोग तज्ञ डॉ. अजित जाधव तसेच, फुफ्फुस प्रत्यारोपण व श्वसन विकार तज्ञ डॉ. राहुल केंद्रे, हृदय शल्यचिकित्सक डॉ. आशिष डोळस, श्वसन विकार विभागाचे प्रमुख डॉ. एम. एस. बरथवाल आणि बहू अवयव प्रत्यारोपण विभागाच्या संचालिका डॉ. वृषाली पाटील उपस्थित होत्या.

COMMENTS