Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस भरतीत बनावट प्रमाणपत्र सादर करणे पडले महागात

पुणे : लोहमार्ग पोलीस दलातील भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणार्‍या उमेदवारास न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंड अशी

नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही :धनजंय मुंडे
निर्यातबंदी आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न
हिंगणघाट जळीतकांड निकाल : विक्की नगराळेला मरेपर्यंत जन्मठेप | LOKNews24

पुणे : लोहमार्ग पोलीस दलातील भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणार्‍या उमेदवारास न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सागर लालसिंग राठोड (वय 31, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे शिक्षा सुनावलेल्या तरुणाचे नाव आहे.
पुणे लोहमार्ग पोलीस दलातील भरती प्रक्रियेत राठोड याने बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात राठोडविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले सरकार पक्षाच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने राठोडला विविध कलमांन्वये दोषी ठरवले. त्याला खडकी न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी पाच वर्ष सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड यांनी याप्रकरणाचा तपास केला होता.

COMMENTS