Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जमीन विक्रीच्या वादातून तरुणाचा खून

भावासह काकाने मृतदेह फेकला घोडनदीत ; 3 जण अटकेत

पुणे ः तब्बल 5 दिवसांपूर्वी घोडनदीत आढळलेल्या तरूणाच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पुणे ते अहमदनगर रस्त्यावर शिरूर तालुक्यात पाच

सांगोल्यात पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाने खळबळ
पुण्यात सिंहगड रोडवर फळविक्रेत्याची हत्या
यवतमाळ मध्ये भररस्त्यात शिवसैनिकाची हत्या

पुणे ः तब्बल 5 दिवसांपूर्वी घोडनदीत आढळलेल्या तरूणाच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पुणे ते अहमदनगर रस्त्यावर शिरूर तालुक्यात पाचर्णे मळा परिसरातील घोडनदीपात्रात 31 जानेवारी रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. नदीपात्रात सदर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह हातपाय दोरीने बांधलेल्या स्थितीत दिसून आले होते. मृत व्यक्तीस मारहाण करून, त्याचे हात-पाय बांधून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नदीत फेकून देत त्याचा खून करण्यात आल्याचा गुन्हा शिरूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपासात पोलिसांनी बीड येथून तीन आरोपी अटक केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मयत हा ‘जमीन विक्री करा’ म्हणून सतत दारू पिऊन भांडण करत असल्याने सख्खा भाऊ व चुलत्याने संबधित खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.
कृष्णा गोकुळ विघ्ने (वय -32, रा. आनंदगाव, शिरूर कासार, ता. शिरूर कासार, जि. बीड) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पांडुरंग अर्जुन विघ्ने (वय -50, रा. आनंद गाव, शिरूर कासार, ता. शिरूर कासार, जि. बीड), अजिनाच गोकूळ विघ्ने (वय -26), गणेश प्रभाकर नागरगोजे (वय -29, रा. एकलवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबधित गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी गुन्हा तत्काळ उघडकीस आणून, आरोपींना पकडण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांना दिल्या होत्या. गुन्ह्याचा तपास करताना, मृतदेह नदीपात्रातील पाण्यात आढळल्याने केवळ चेहर्‍यावरून त्याची ओळख पटविणे अशक्य होते; मात्र, पोलिसांनी कौशल्याचा वापर करून मृतदेहाची ओळख पटवली. पोलीस तपासात मृताचे नाव कृष्णा विघ्ने असल्याचे निष्पन्न होऊन तो बीडचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना एका बातमीदारकडून माहिती मिळाली की, मृत कृष्णा विघ्ने याचा भाऊ अजिनाथ गोकूळ विघ्ने, चुलता पांडुरंग विघ्ने व गणेश नागरगोजे यांनी हा खून केला आहे. त्यानुसार पोलिसांनी या आरोपींना शिरूर कासार येथे सापळा रचून अटक केले., त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, आरोपींनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. मृत कृष्णा हा दारूचा व्यसनी होता. तो ‘कुटुंबात जमीन विक्री करा,’ असे म्हणून सतत भांडण करत होता. या कारणा वरून आरोपींनी त्याचा खून केल्याचे सांगितले आहे. तीन आरोपीना न्यायालयात हजर केले असता ,सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

COMMENTS