नाशिक प्रतिनिधी - शासकीय एलिमेंटरी-इंटरमिजिएट परीक्षेत पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल
नाशिक प्रतिनिधी – शासकीय एलिमेंटरी-इंटरमिजिएट परीक्षेत पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे.
एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत श्रावणी सुनील मुठाळ, अक्षदा शिवाजी मुठाळ, सारंग नवनाथ मुंजे, सबा रमजान शेख, मानसी शांताराम टिळे, पियूष विक्रम आडके, वैष्णवी ज्ञानेश्वर आडके, आविष्कार विलास घुगे, श्रावणी कृष्णा गायधनी, सिद्धांत बहिरू गोरे यांनी ब श्रेणी संपादन केली. तर सिद्धार्थ सानप, ओमकार मते, रूपेश यादव, प्रिया शिरोळे, वैष्णवी भागवत यांनी इंटरमिजिएट परीक्षेत ब श्रेणी संपादन केली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक प्रदीप शिंदे यांनी मार्गदर्शन विशेष केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे नासाकाचे अवसायक बबनराव गोडसे, मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे, मुख्याध्यापक सुनील बर्वे, शिक्षक-कर्मचारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS