Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’गाळ मुक्त तलाव गाळयुक्त शिवार’ योजना गेली कुणीकडे?

खटाव तालुक्यात शेतकर्‍यांना तलावातील गाळ मिळू द्यातालुक्यातील शेतकर्‍यांकडून महसूल प्रशासनाला विनवणी : ’गाळ मुक्त तलाव गाळयुक्त शिवार’ योजना गे

महाविद्यालयीन युवकाशी अनैसर्गिक संबंध ठेवल्याप्रकरणी हावलदाराविरुध्द गुन्हा दाखल
गावात नको बार-नको वाईन शॉप; वाठारच्या महिला पाठोपाठ आता पुरूषांचीही सुर
जिल्हा कोषागार अधिकारी धनाजी शिंदे यांना मुंबईत उपसंचालक पदी पदोन्नती

खटाव तालुक्यात शेतकर्‍यांना तलावातील गाळ मिळू द्या
तालुक्यातील शेतकर्‍यांकडून महसूल प्रशासनाला विनवणी : ’गाळ मुक्त तलाव गाळयुक्त शिवार’ योजना गेली कुणीकडे?
वडूज / प्रतिनिधी : खटाव तालुक्यातील असणार्‍या तलावातून शेतीसाठी गाळ मिळू द्या अशी आर्त हाक आता तालुक्यातील शेतकरी महसूल प्रशासन व संबंधित विभागाला देताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे गाळ मुक्त तलाव गाळ युक्त शिवार अशी योजना शासन दरबारी सुरु असताना इकडे मात्र गाळ काढण्याच्या परवानगी साठी शेतकर्‍यांना हेलपाटे मारावे लागत असल्याची चर्चा आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या महिन्यात खटाव तालुक्यातील महसूल प्रशासनाने येथील येळीव, दरजाई व काही ठिकाणी गाळ काढण्यासाठी शेतकर्‍यांना परवानगी दिली होती. या ठिकाणच्या शेतकर्‍यांनी शासनाचा असणारा महसूल भरून ही परवानगी काढली होती. ज्या शेतकर्‍यांनी परवानगी काढली होती. त्यांनी उतखनन करण्यास सुरुवात सुध्दा केली होती.
दरम्यान, याबाबतचे वृत्त प्रसार माध्यमातून प्रसिध्द झाल्यानंतर महसूलच्या काही कर्मचार्‍यांनी याठिकाणी जाऊन परवानगीधारक शेतकर्‍यांना गाळ काढण्यास बंद करण्यास सांगितले. यामुळे शेतकर्‍यांचे पैसे मातीत गेले का? अशा तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. शेतकर्‍यांचे काही शिष्ट मंडळ तहीलदार बाई माने यांना येऊन भेटले सुध्दा मात्र आता जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घ्यावी, असे सांगण्यात आल्याचे समजले.
एकीकडे खोलीकरण करून तलावतील पाणी साठ्यात वाढ करण्यात येईल, असे असताना सुध्दा शेतकरी महसूल भरून सुध्दा गाळ मिळवण्यासाठी धडपडत असताना महसूल अशा कामात दिरंगाई का करत आहे असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. खटाव तालुक्याची तहान भागवणारे येरळवडी धरणात मोठ्या प्रमाणत गाळ आहे. त्याठिकाणी सर्व परवानगी घेऊन उपसा केल्यास याठिकाणी धरणच्या खोलीत वाढ होऊन पाणी साठा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.
मात्र, सदरचे धरण हे वनविभगाच्या अख्तरित येत असल्याचे कारण देत याठिकाणी गाळ उपसा करण्यास परवानगी मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे आता जिल्हाधिकारी यांनी खटाव सारख्या दुष्काळी भागाकडे लक्ष देऊन शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

खटाव तालुक्यातील जल संधारण विभागाच्या अखतरीत येणार्‍या तलावातील गाळ काढण्यासाठी रीतसर परवानगी काही शेतकर्‍यांनी घेतली आहे. त्यांच्या असणार्‍या नियमाप्रमाणे गाळ उपसा सुध्दा करण्यात आला होता. मात्र, त्याठिकाणी तलावलगत असणार्‍या काही लोकांनी वादा वादी करून शेतकर्‍यांना त्रास देणे सुरु केले आहे. त्यामुळे काही शेतकर्‍यांना पैसे भरून ही मोकळ्या हातांनी परत जावे लागले आहे. यावर प्रशासनाने तोडगा काढण्याची मागणी होताना दिसत आहे.

COMMENTS