नवी दिल्ली ः अमेरिकेमधील जॉर्जियामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. अगदी क्रूरतेने आणि निर्दयीपणे या विद्यार्थ्याला संपवण्यात
नवी दिल्ली ः अमेरिकेमधील जॉर्जियामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. अगदी क्रूरतेने आणि निर्दयीपणे या विद्यार्थ्याला संपवण्यात आले आहे. हातावर पाठीवर आणि तोंडावर घाव केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विवेक सैनी असे या भारतीय विद्यार्थ्याचे नाव आहे. 25 वर्षिय विवेक क्लीवलँड रोड येथे एका दुकानात नोकरी करत होता. जूलियन फॉकनर (वय 53) असे आरोपीचे नाव आहे. सध्या तो पोलिसांच्या अटकेत आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
COMMENTS