Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याच्या यशानंतर पाथर्डी शहरासह तालुक्यात  जल्लोष

पाथर्डी प्रतिनिधी - मनोज जरांगे पाटील यांनी सात महिन्यांपासून सुरू केलेल्या आरक्षणाच्या लढ्याला मिळालेल्या यशानंतर शहरासह तालुक्यात मराठा समा

अकोले रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी माजी प्राचार्य सातपुते
दैनिक लोकमंथन l बोठेनं मेव्हण्याला हुतात्मा दाखवून घेतला पाच लाखांचा लाभ
संगमनेर तालुक्यातील पर्यटन विकासासाठी 3 कोटीचा निधी मंजूर

पाथर्डी प्रतिनिधी – मनोज जरांगे पाटील यांनी सात महिन्यांपासून सुरू केलेल्या आरक्षणाच्या लढ्याला मिळालेल्या यशानंतर शहरासह तालुक्यात मराठा समाजबांधवांच्या वतीने फटाके फोडत,पेढे वाटत आणि डिजेच्या तालावर ठेका धरत जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच शहरातून युवकांनी डीजे वाजवत मिरवणुक काढली यावेळी मिरवणुकीच्या मार्गावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर,वसंतराव नाईक,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.यावेळी शहरातील मराठा समाजबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शुक्रवारी मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळातील दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्याची राजपत्रक त्यांच्या हाती सुपूर्द केलं.त्यानंतर शनिवारी (२७) सकाळी जरांगे पाटील त्यानंतर जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.यावेळी मुख्यमंत्र्यांसोबतच भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित आहेत.

        त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांनी सभा घेत साथ देणाऱ्या समाजबांधवांचे अभिमान वाटतो अंतरवालीमधून निघाल्यापासून खूप संघर्ष केला आहे.कधी रस्त्यावर झोपलो तर कधी खायला मिळाला नाही. पोरांनी या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यात,घरातला कर्ता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडलं.हे बलिदान व्यर्थ जाऊ नये याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर होती,असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS