Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार ः सदावर्ते

मुंबई ः मराठा आरक्षणाचासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात आम्ही लवकरात लवकर न्यायालयाचे दार ठोइत्तवणार असल्याचे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्

नवाब मलिकांचा कोठडीतील मुक्काम वाढला
वीजबिल वसूली उद्दीष्ट पूर्ण करा; अन्यथा कठोर कारवाई
डिक्कीतून नेला बाळाचा मृतदेह

मुंबई ः मराठा आरक्षणाचासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात आम्ही लवकरात लवकर न्यायालयाचे दार ठोइत्तवणार असल्याचे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय न्यायालयात टिकतो का, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच ज्यांनी या आरक्षणामध्ये पाणी टाकण्याचे काम केले, मराठा जनेतेने कायद्याचे वाचन करावे, असा सल्लाही यावेळी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.

सदावर्ते पुढे बोलताना म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, देशातील महाराष्ट्रात माझ्यावर अशी जबाबदारी आहे की, खुल्या वर्गातील ब्राम्हण, वैश्य, जैन, मागासवर्गीयांमधील गुणवंत असतील यांच्या अधिकार्‍यांच्या जागा शाबुत ठेवणे, त्यावर गदा येऊ न देणे, त्यासोबतच खर्‍या मागासवर्गीय जाती आहेत, त्यांची गुणवत्ता एका विशिष्ट स्तरावर आणणे, याची जबाबदारी आमच्यावर आहे. सदावर्ते म्हणाले की, आजच्या प्रकारच्या नोटिसेस दिल्या जाऊ शकतात, मात्र कायद्यानुसार आरक्षण टिकू शकत नाही. मराठा समाजाची फसवणूक झाली आहे. यापुढे मराठा समाजाला एथड व ओपनमधील आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. खुल्या वर्गातील गुणवंतांच्या जागा सुरक्षित राहिल्या पाहिजेत. मागास वर्गातील कष्टकरी आहेत, त्यांनाही न्याय मिळायला हवा. मात्र, आज दिली ती नोटीस आहे. आम्ही लवकरच न्यायालयात जाणार, संजय राऊतांनी माझ्या मराठा भावांना भरीस घातले, मराठा बांधवांनी कायद्याचे वाचन करावे आणि कलमे बघावीत. असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. सगेसोयरे याबाबत जे बोलले गेले, ते आधीपासून कायद्यात अंतर्भूत आहेत. कुणीही या गोष्टीला विजयोत्सव वगैरे म्हणू नये, जरांगेंकडून ही दिशाभूल केली जाणारी बाब. वेगवेगळे स्टंट केले जातात, त्यांपैकी हा एक पॉलिटीकल स्टंट. कायद्यात हे प्रकरण टिकू शकत नसल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे.

COMMENTS