Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार रोहित पवारांना ईडीचे समन्स

अहमदनगर ः राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती येथील बारामती अ‍ॅगो या कंपनीवर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छापे टाकत महत्

खर्डा दसरा महोत्सवाला आंतरराष्ट्रीय कलाकारांची हजेरी
आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी
राष्ट्रवादीचा काँग्रेस जामखेड तालुकाध्यक्ष कोण?

अहमदनगर ः राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती येथील बारामती अ‍ॅगो या कंपनीवर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छापे टाकत महत्वाचे कागदपत्रे ताब्यात घेतली होती. त्यानंतर आता ईडीने आमदार रोहित पवारांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. आता रोहित पवार यांना थेट ईडीने समन्स पाठवलं असून बुधवारी चौकशीसाठी बोलावण्यात आलेले आहे. त्यामुळे रोहित पवारांच्या समोरील अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.
याआधीही ईडीने रोहित पवार यांच्याशी संबधित बारामती अ‍ॅग्रो कारखाना आणि याशी संबंधित सात ठिकाणी तपासणी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वतीने राबवण्यात आलेली लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली होती. या लिलाव प्रक्रियेमध्ये बारामती अ‍ॅग्रो कारखान्याचा काय संबंध होता? याचा तपास ईडी करत आहे. याचप्रकारणी ईडीने रोहित पवार यांना समन्स बजावले असल्याची माहिती आहे.

COMMENTS