Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्तृत्ववान मुलाने फेडले आई वडिलांचे पांग… सोमनाथ घोलप  PSI पदी 

नाशिक प्रतिनिधी  - ग्रामीण भागातून आपला गावगाडा आणि शेती व्यवसाय सांभाळून आपले ध्येय प्राप्त करणारा सोमनाथ घोलप आज अखेर पी.एस.आय. झाला आहेत.  नाश

निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 7 आमदारांसह 17 सदस्य अनुपस्थित
अग्निशमन दलाची वीज खंडीत
भंडारदरा धरण 70 टक्के भरले

नाशिक प्रतिनिधी  – ग्रामीण भागातून आपला गावगाडा आणि शेती व्यवसाय सांभाळून आपले ध्येय प्राप्त करणारा सोमनाथ घोलप आज अखेर पी.एस.आय. झाला आहेत.  नाशिक च्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतून प्रशिक्षण घेऊन सोमनाथ च्या यशाला खरे स्वरूप प्राप्त झाले आहेत.

प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र १२३ मधील २४६ पुरूष व ०५ महिला (एकुण २५१) खात्यांतर्गत सरळसेवा प्रशिक्षणार्थी यांचे मुलभूत प्रशिक्षण पूर्ण झाले. आज दि. १७/०१/२०२४ रोजी सकाळी ०९.०० वाजता महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथील मुख्य कवायत मैदान येथे दीक्षांत संचलन समारंभ संपन्न झाला. सदर कार्यक्रमास मा. श्री. संजय कुमार, माननीय सदस्य, राज्य मानवी हक्क आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई (सेवानिवृत्त पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.) हे मुख्य अतिथी म्हणुन उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षणार्थी यांच्याकडून मानवंदना स्वीकारली. श्री. राजेश कुमार, संचालक, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक यांनी सर्व प्रशिक्षणार्थी यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

सोमनाथ घोलप हा ३५ वर्षीय नवयुवक हा मूळचा चांदवड तालुक्यातील हिवरखेडे येथील शेतकरी घरातील मुलगा असल्याने प्राथमिक शिक्षण गावात व दहावी पर्यंत चे शिक्षण हे दिघवद येथे पूर्ण केले.  काबाड कष्ट आणि मग शाळा कॉलेजसाठी बाहेर पडल्याने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सोमनाथ याने २०१२ मध्येच खरे यश संपादन करून राज्य राखीव दला (एस.आर.पी.एफ.) मध्ये आपली नोकरी पक्की केली असली तरी अधिकारी बनण्याचे स्वप्ने त्यास शांत बसू देत नसत। त्यामुळे दौंड येथे शासकीय सेवेत असतांना नवी मुंबईत बदली झाल्याने अजूनच आकांक्षा वाढत गेल्या आणि अभ्यास देखील. मात्र जिद्द आणि चिकाटी यांचा बरोबर मेळ घालत आपल्या संसाराच्या रगाड्यातून देखील आपली नौका यशस्वी रित्या वाहून आणली.  ३ एप्रिल २३ मध्ये सोमनाथ ने आपली सरळ सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत प्रशिक्षण पुर्ण करत विजयास गवसनी घातली आहेत. 

COMMENTS