Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राधेश्याम मोपलवार यांना जीवनगौरव पुरस्कार

मुंबई ः महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना ‘विवेकानंद युथ कनेक्ट फाउंडेशन’च्या वतीने जीवनगौ

भीषण अपघात; 2 कंटेनर दरीत कोसळले 
बांगलादेशात आगीत 44 जणांचा मृत्यू
डीजेचं सामान घ्यायला गेले, पण घरी परतलेच नाहीत!

मुंबई ः महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना ‘विवेकानंद युथ कनेक्ट फाउंडेशन’च्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या वेगवान कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृह येथे विवेकानंद युथ कनेक्ट फाऊंडेशनतर्फे ‘मुंबई शाश्‍वत विकास शिखर परिषद’ आयोजित करण्यात आली होती. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते या परिषदेचे उदघाटन करण्यात आले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, हिंदुजा उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक हिंदुजा, टाटा ट्रस्टचे मुख्य अधिकारी सिद्धार्थ शर्मा, विवेकानंद युथ कनेक्ट फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. राजेश सर्वज्ञ, पार्श्‍वगायिका अनुराधा पौडवाल, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पर्यावरण, संस्कृती व समाजसेवा क्षेत्रातील ’मुंबई सस्टेनेबिलिटी’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

COMMENTS