Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉक्टर अन् पत्रकार समाजाच्या विकासासाठी मुख्य घटक – डॉ गुंजाळ

नाशिक प्रतिनिधी - लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेचे कार्य झपाट्याने बदलत असून, कामकाज गतिमान झाले आहेत.  डॉक्टर अन् पत्रकार  समाजाच्या व

बांगलादेशात आगीत 44 जणांचा मृत्यू
बावनकुळे यांच्या जुन्या मतदारसंघात खापा आणि गुमथी दोन्ही ठिकाणी भाजप विजयी 
महाराष्ट्राला गुन्हेगारीचा विळखा !

नाशिक प्रतिनिधी – लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेचे कार्य झपाट्याने बदलत असून, कामकाज गतिमान झाले आहेत.  डॉक्टर अन् पत्रकार  समाजाच्या विकासासाठी मुख्य घटक आहे.  या बदलत्या परिस्थितीत पत्रकारांनी आपल्या स्वास्थ्याकडेही लक्ष द्यावे असे आवाहन इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ यांनी केले. 

 इंडियन मेडीकल असोसिएशन नाशिकच्या वतीने  पत्रकार दिनानिमित्त शनिवारी ( दि.६ जानेवारी)    शालिमार येथील आयएमए सभागृहात आयएमएतर्फे शहरातील पत्रकारांचा गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष  डॉ.प्रकाश जोशी,  सह सेक्रेटरी डॉ.निलेश जेजुरकर, डॉ पंकज भट, नाशिक रोड आयएमएच्या अध्यक्ष डॉ. स्वप्नांजली आव्हाड, सेक्रेटरी डॉ महेश मांगुळकर  आदी उपस्थित होते. 

डॉ.गुंजाळ म्हणाले की, डॉक्टरां पाठोपाठ काहीवेळा पत्रकारांनाही समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. परंतु   दोन्ही घटकांचा उद्देश हा समाजाची अन् देशाची सेवा करणे आहे. त्यामुळे पुढील काळातही पत्रकारांनी लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी अधिक  जोमाने काम करावे असे आवाहन डॉ. गुंजाळ यांनी केले. यावेळी पत्रकारांच्या वतीने प्रवीण बिडवे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन जितेंद्र येवले यांनी केले.  कार्यक्रमास पत्रकारांचे परिवार ,आयएमएचे पदाधिकारी, डॉक्टर उपस्थित होते. 

यांचा झाला सत्कार- सोहळ्यात प्रविण बिडवे ,रमेश पडवळ – (महाराष्ट्र टाईम्स) प्रशांत कोतकर , अरुण मलानी ( सकाळ) संतोष सोनवणे ( टाईम्स ऑफ इंडिया) , धनंजय बोडके ( लोकनामा) ,चंद्रशेखर गोसावी (हमारा महानगर) , रवींद्र केडिया, नरेंद्र जोशी ( देशदूत)  अतुल भांबेरे , योगेश गांगुर्डे  (पुण्यनगरी),   निलेश अमृतकर, सचिन जैन (दिव्य मराठी) , देवयानी सोनार  (गावकरी)  कुमार कडलग (प्रहार),  अनिकेत साठे ( लोकसत्ता) अजय भोसले (लक्ष महाराष्ट्र), धनंजय रिसोडकर, संदीप भालेराव (लोकमत) स्मिता कावळे  (लोकमत टाईम्स)जितेंद्र येवले ( लोकज्योती) , जितेंद्र सपकाळे  (देशदूत टाईम्स), सतिश डोंगरे ( पुढारी), ,योगेश रोकडे,( लोकमंथन), मुकुंद बाविस्कर (भ्रमर ), अकील पटेल ( आपलं महानगर)

COMMENTS