पुणे ः राज्यात नववर्षाचा उत्साह बघायला मिळत असतांना दुसरीकडे थंडीचा जोर ओसरतांना दिसून येत आहे. यासोबतच हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता हव
पुणे ः राज्यात नववर्षाचा उत्साह बघायला मिळत असतांना दुसरीकडे थंडीचा जोर ओसरतांना दिसून येत आहे. यासोबतच हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात पावसाळा पोषक वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तर येत्या बुधवारपासून कोकणात आणि गुरुवारपासून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे राज्यात नववर्षाचे स्वागत हे पावसानेच होण्याची शक्यता आहे. हिंदी महासागर आणि अरबी समुद्राच्या आग्नेयेकडे सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे वार्यांची दिशा सध्या वायव्येकडे जाताना दिसत असून, ती दिवसागणिक आणखी तीव्र होत आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये या वार्यांचे रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होऊन कोकण पट्ट्यासह राज्यातील काही भागांत पावसाच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशासह राज्यातील हवामानावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळणार आहे. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील 17 तसेच विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात अशा एकूण 22 जिल्ह्यात 1 ते 7 जानेवारी दरम्यानच्या आठवड्यात फक्त काही ठिकाणीच किंचित ढगाळ वातावरण राहू शकते. या जिल्ह्यांच्या तुरळक ठिकाणी अगदी किरकोळ पावसाची देखील शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हंटले आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या अखेरीस राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे. आज राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता असल्याने थंडी कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणार्या वार्यांमुळे महाराष्ट्र चांगलाच गारठला होता. अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली गेला होता होता. मात्र आता या थंडीपासून दिलासा मिळाला आहे.
COMMENTS