Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा ः भातखळकर

मुंबई ः अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या 22 जानेवारी रोजी राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. याच दिवशी

वारणा नदी काठी आढळली 6 फुटांची मगर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
केरळमधील कोझिकोड मध्ये निपाह व्हायरसमुळे २ जणांचा मृत्यू
स्वतंत्र ट्रान्सफार्मरसाठी राजूरी येथे रस्ता रोको

मुंबई ः अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या 22 जानेवारी रोजी राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. याच दिवशी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभर 22 उत्सवाचा वातावरण असणार आहे. त्यामुळे 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राममंदिराच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमांना सर्वांना उपस्थित राहता यावे, यासाठी सार्वजनिक सुट्टी आवश्यक आहे. खासगी आस्थापनांना आवश्यक ते निर्देश द्यावेत, असं अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

COMMENTS