Homeताज्या बातम्यादेश

नितीशकुमार जेडीयूचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

लल्लन सिंह यांचा अखेर अध्यक्षपदाचा राजीनामा

नवी दिल्ली ः आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्षांकडून रणनीती आखण्यात येत असू, बिहारमधील जनता दल युनायटेड पक्षात मोठे फेरबदल शुक्

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वावर जनतेचा विश्‍वास ः ना. राधाकृष्ण विखे पाटील
Solapur : शासनाच्यावतीने मिळणाऱ्या कर्जमाफी योजनेत सरकारची फसवणूक | LOKNews24
बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये दोन कर्मचार्‍यांचे संगनमत; 3.26 कोटींचा केला अपहार

नवी दिल्ली ः आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्षांकडून रणनीती आखण्यात येत असू, बिहारमधील जनता दल युनायटेड पक्षात मोठे फेरबदल शुक्रवारी बघायला मिळाले. राजधानी दिल्लीत जनता दल युनायटेडच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. याच बैठकीत  राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह ऊर्फ लल्लन सिंह यांना बाजूला सारून आता नितीश कुमार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत.
विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून कोणाचे नाव येणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. इंडिया आघाडीमधील अनेक बडे नेते यासाठी इच्छुक आहेत. ज्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाव आघाडीवर आहे. या चर्चा सुरू असतानाच जेडीयूमध्ये मोठा बदल करण्यात आला असून नितीश कुमार यांची पुन्हा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.  विरोधकांकडून इंडिया आघाडी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, जेव्हा नितीश कुमार यांनी विरोधकांच्या एकतेसाठी पुढाकार घेतला यामध्ये लल्लन सिंह यांनी प्रमुख भूमिका निभावली होती. पण शेवटी विरोधकांच्या इंडिया आघाडीचे समन्वयकपद नितीश कुमार यांना मिळाले नाही, तर त्यांच्या प्लॅनचा वापरही केला नाही. यामुळे नाराज असलेले जेडीयूतील अनेक जण पुन्हा एनडीएच्या मार्गावर जाण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. याच कारणामुळे लल्लन सिंह देखील जेडीयूतून बाहेर पडणार असल्याचे सांगितले जात आहे. या चर्चांमधूनच त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.
राजीनामा देण्याच्या आधी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लल्लन सिंह हे एकाच गाडीतून सभेच्या ठिकाणी आले. यावेळी जदयूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नितीश कुमार जिंदाबाद, देश का प्रधानमंत्री कैसा हो, नितीश कुमार जैसा हो, अशा प्रकारच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. लल्लन सिंह राजीनामा देण्यासाठी तयार नव्हते. मला बाजूला केले तर इंडिया आघाडीत चुकीचा संदेश जाईल, अशी लल्लन सिंह यांची धारणा होती. मात्र पक्षातील इतर नेत्यांना नितीश कुमार हेच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत असे वाटत असल्यामुळे त्यांना बाजूला व्हावे लागले.

लल्लन सिंह यांना हटविण्याचे कारण? – गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल यावर चर्चा झडतांना दिसून येत आहे. नितीशकुमार पंतप्रधान पदासाठी इच्छूक असतांना देखील त्यांच्या पक्षाने इंडिया आघाडीसमोर त्यांची बाजू व्यवस्थितरित्या मांडलेली नाही, आवश्यक ती चर्चा करू शकले नाहीत, असे नितीश कुमार यांचे मत आहे. याच कारणामुळे नितीश कुमार हे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा निर्णय घेत आहेत, असे म्हटले जात आहे. काही दिवसांपासून नितीश कुमार हे लल्लन सिंह यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर नाराज असल्याचे म्हटले जात आहे. तसेच त्यांची राष्ट्रीय जनता दलाशी जवळीक वाढली असल्यामुळे पक्ष नाराज आहे.

COMMENTS