Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

येरवडा कारागृहात कैद्याची हत्या

पुणे : येरवडा कारागृहात एका कैद्याची कात्री भोसकून हत्या करण्यात आली. याप्रकरणी चार कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच

येरवडा कारागृहातील स्वच्छतागृहात आढळला मोबाईल संच
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी येरवडा कारागृहातून पसार
अट्टल गुन्हेगार येरवडा जेलमधून फरार

पुणे : येरवडा कारागृहात एका कैद्याची कात्री भोसकून हत्या करण्यात आली. याप्रकरणी चार कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारागृहातील ‘सर्कल 2’ मधील ‘बराक 1’ च्या आवारात हा प्रकार घडला. कैद्यांच्या हल्ल्यात कैद्याचा मृत्यू झाल्याने कारागृहात मोठी खळबळ उडाली. महेश महादेव चंदनशिवे असे हत्या झालेल्या कैद्याचे नाव आहे. तर, अनिकेत श्रीकृष्ण समदूर, महेश तुकाराम माने, आदित्य संभाजी मूरे आणि गणेश हनुमंत मोटे असे आरोपींची नावे आहेत.
मयत महेश चंदनशिवे आणि मुख्य आरोपी गणेश मोटे यांच्यात 2021 मध्ये कारागृहात वाद झाला होता. या वादामुळे दोघांमध्ये हाणामारी देखील झाली. दरम्यान, गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास चारही आरोपींनी चंदनशिवेला जबर मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी कारागृहात लपविलेल्या कात्रीने चंदनशिवेच्या मानेवर वार केले. या घटनेची माहिती मिळताच कारागृहातील रक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी चंदनशिवे रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर पडलेला दिसला. चंदनशिवेला तातडीने कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला ताबडतोब पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती येरवाडा कारागृह प्रशासनाने दिली. महेश चंदनशिवे याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती. तर, चंदनशिवे यांची हत्या करणार्‍या कैद्यांविरुद्ध हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना येरवडा कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले.

COMMENTS