Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोबाईल, लॅपटॉप चोरणारी टोळी जेरबंद

14 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

पुणे ः पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तलयांतर्गत विविध भागात सकाळच्या धावपळीच्या वेळी लोकांच्या घरांतून लॅपटॉप, मोबाईल चोरीस जाण्याच्या घटनात मोठ्या प्

सचिव भांगे यांचा तो दौरा बेनामी संपत्तीची विल्हेवाट लावण्यासाठी का ?
हिम्मत असेल तर विरोधकांनी साखर कारखाने चालवून दाखवावेत… अजित पवारांचे खुले आव्हान
Aaurngabad : औरंगाबाद शहरात हिंदू दलित महासंघाची चर्चासत्र व बैठक संपन्न

पुणे ः पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तलयांतर्गत विविध भागात सकाळच्या धावपळीच्या वेळी लोकांच्या घरांतून लॅपटॉप, मोबाईल चोरीस जाण्याच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. याअनुषंगाने वाकड पोलिसांनी शोध घेऊन सदर चोर्‍या करणारी तमिळनाडूची टोळी गजाआड केली आहे. त्यांच्या ताब्यातून 14 लाख 30 हजार रुपये किंमतीचे 60 मोबाईल फोन व 14 लॅपटॉप असा ऐवज हस्तगत करुन 23 गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी दिली आहे. सौदारजन गोविंदन (21), गुनासेकर संकर (वय-21), तामीलारसन मादेश (21, दोघे रा.भोसरी, पुणे, मु.रा.वेल्लोर, तमिळनाडू) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जावदवाड यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण यांनी सदर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केले. या प्रकरणी त्यांनी दाखल गुन्ह्यांतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. त्यात त्यांना 3 वेगवेगळ्या वर्णनाचे आरोपी वाकड हद्दीत चोर्‍या करून काळेवाडी फाटा येथूनच ते रिक्षाने पिंपरीकडे जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी चार वेगवेगळी पथके तयार करुन, भूमकर चौग, डांगे चौक, काळेवाडी फाटा, जगताप डेअरी याठिकाणी सापळा रचून, सीसीटीव्ही फुटेज मधील संशयित व्यक्तींचा शोध सुरु केला. त्यानुसार, काळेवाडी फाटा येथे एक संशयित व्यक्ती चालत जाताना दिसल्यावर, पोलिसांनी त्याला थांबवून त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ 2 लॅपटॉप व 3 मोबाईल मिळून आले. सौदराजन गोविंदन या आरोपीकडे तपास करताना पोालिसांना भाषेची अडचण निर्माण झाली. आरोपीला तामिळ भाषा सोडून दुसरी कोणती भाषा येत नाही. पोलिस तपासात हा आरोपी तामिळनाडू राज्यातील ज्या भागात राहतो, तिथे याच पध्दतीने गुन्हे करणारे इतर लोक राहत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी ठरवलेल्या वेळेत परत आले नाही तर त्यांचे कुटुंबातील इतर सदस्य व साथीदार हे रुम सोडून मुद्देमालासह पळून जातात, अशी माहिती पोलीसांना प्राप्त झाली. सदर आरोपी त्याचे साथीदार यांची माहिती देत नव्हता तसेच रहाण्याचा पत्ता पोलिसांना सांगत नव्हता. परंतु पोलिसांनी तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे आरोपी भोसरीत राहत असल्याचे शोधून काढले.

COMMENTS