Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘सूर लागू दे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

१२ जानेवारी २०२४ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

'सूर लागू दे'    दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा 'सूर लागू दे' हा शेवटचा चित्रपट असल्याने कलाकारांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनाच या चित्रपटाब

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विविध उपक्रम
५५० अनाथ, गोरगरीब मुलींचे लावले विवाह… शेख खलील चौधरी यांना जीवनगौरव पुरस्कार
उपमुख्यमंत्री जेव्हा बॉम्ब फोडतील तेव्हा उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जेल मध्ये असतील – आ. रवी राणा 

‘सूर लागू दे’    दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा ‘सूर लागू दे’ हा शेवटचा चित्रपट असल्याने कलाकारांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनाच या चित्रपटाबाबत कुतूहल आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला असून सोशल मीडियावर अल्पावधीत ‘सूर लागू दे’च्या ट्रेलरला तूफान प्रतिसाद मिळू लागला आहे. १२ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.  आॅडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्माते अभिषेक ‘किंग’ कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी ‘सूर लागू दे’ या चित्रपटाची निर्मिती केली असून अश्विन पांचाळ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. प्रवीण विजया एकनाथ बिर्जे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पिकल एंटरटेन्मेंट स्टुडिओज हा चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वितरीत करणार आहे. या चित्रपटाचं लेखन आशिष देव यांनी केलं आहे. ‘सूर लागू दे’चा ट्रेलर पाहताक्षणीच लक्ष वेधून घेणारा आहे. चित्रपटात काय पाहायला मिळेल याची झलक ट्रेलरमध्ये दिसते. विक्रम गोखले आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले आहेत. त्यांची केमिस्ट्री, अभिनयातील परीपक्वपणा आणि देवाणघेवाण ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. चित्रपटातील गाणीही सुरेख असून, अर्थपूर्ण संवाद उत्सुकता वाढवणारे आहेत. रीना मधुकर प्रमुख भूमिकेत असून त्यांनी टेलिव्हिजन आणि हिंदी, मराठी सिनेमातून उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. मेघना नायडू यांची सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यापूर्वी मराठीसाठी गाणं करणाऱ्या मेघनाने या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच भूमिका साकारली असून या चित्रपटात मेघना पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. एक अनमोल संदेश देणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचं एक परिपूर्ण पॅकेज ठरणारा असल्याचं ट्रेलर पाहिल्यावर जाणवतं. याबाबत दिग्दर्शक प्रवीण बिर्जे म्हणाले की, या चित्रपटाचं कथानक कालातीत आहे. हे जगाच्या पाठीवर कुठेही घडू शकणारं असल्याने कोणत्याही प्रेक्षकाला हे आपलंसं करणारं आहे. यातील कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी असून, यातील श्रवणीय गीत-संगीत मन मोहून टाकणारं आहे. संगीतकार पंकज पडघन यांचं संगीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल.  ‘सूर लागू दे’ हा चित्रपट समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब दाखवणारा आहे. मानवाने ठरवलं तर कर्माच्या बळावर तो नराचा नारायण होऊ शकतो. एखादी चांगली गोष्ट करताना वय केवळ आकडा बनून राहातं. आयुष्याच्या संध्याकाळीही इतरांसाठी प्रेरणादायी कार्य करण्याचा संदेश ‘सूर लागू दे’द्वारे सर्वदूर पोहोचणार आहे. विक्रम गोखले, सुहासिनी मुळ्ये, रीना मधुकर, मेघना नायडू यांच्यासह आशिष नेवाळकर, जयराज नायर, सुनील गोडबोले, सिद्धेश्वर झाडबुक्के, नितीन जाधव, आशा ज्ञाते, मेरू वेरणेकर, अनुराधा मोरे, शेखर शुक्ला, संदीप गायकवाड, हितेंद्र उपासनी, प्रदीप पटवर्धन, अस्लम वाडकर, सोमनाथ तळवलकर, सुनील जाधव, दीपिका गोलीपकर, अलका परब, अतुल गानोरकर, दिलीप कराडे, संदीप जयगडे

COMMENTS