Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीत अक्षता मंगल कलशाचे जल्लोषात स्वागत

राहुरी ः अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना निमित्ताने आलेल्या श्रीराम अक्षता मंगल कलशाची राहुरी शहरात ढोल ताशांच्या गजरात व जय

डॉ. शशांक कुलकर्णी यांच्या कृषी संशोधनाची झारखंडच्या राज्यपालांकडून दखल
काँग्रेस अनुसूचित जाती विभाग जिल्ह्यात सक्षम
चोरीच्या विविध गुन्ह्यांतील तीन आरोपींना पकडले

राहुरी ः अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना निमित्ताने आलेल्या श्रीराम अक्षता मंगल कलशाची राहुरी शहरात ढोल ताशांच्या गजरात व जय श्रीराम च्या नार्‍यासह 14 मंगल कलशांची शोभायात्रा उत्साहात काढण्यात आली. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना निमित्ताने आलेल्या मंगल अक्षता कलशाचे राहुरीत उत्साहात आगमन झाले.
या कलशाचे भाविकांकडून पूजन करण्यात आले. शहरातील श्री शनि महाराज मंदिर देवस्थान येथून ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशातील महिला, मुले, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले. जय श्रीराम च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. नवी पेठ येथे झालेल्या मंगल कलश प्रदान कार्यक्रमात प्रा. शिवाजीराव उदावंत यांनी आयोध्या संग्रामाची माहिती दिली. ज्येष्ठ प्रवचनकार कोळी काकी यांनी आशीर्वाद पर शुभेच्छा दिल्या. प्रा. डॉ. रामकिसन ढोकणे यांनी प्रास्ताविक केले .या अभियानाचे उत्तर जिल्हा प्रमुख यमनाजी आघाव तसेच शहरातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 28 डिसेंबर पर्यंत हा मंगल कलश राहुरी परिसरातील राहुरी खुर्द, राहूरी शहरातील शाहू महाराज प्रभाग, शिव चिदंबर प्रभाग, एकलव्य प्रभाग, चंद्रशेखर आझाद प्रभाग, अहिल्यादेवी वस्ती, श्रीकृष्ण प्रभाग, लक्ष्मी नगर प्रभाग, सावता महाराज प्रभाग, येवले आखाडा, आदी शहरातील 10 प्रभागात ( वस्ती ) तील विविध ज्ञाती समाजाच्या मंदिरांमध्ये भाविकांना दर्शनासाठी ठेवला जाणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. एक जानेवारी ते 15 जानेवारी या दरम्यान राहुरी तालुक्यातील राहुरी शहरासह वांबोरी, देवळाली प्रवरा, टाकळी, राहुरी ग्रामीण या सर्व पाच उपखंडांमध्ये नियोजित अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या मंगल अक्षता, निमंत्रण पत्र व प्रभू रामचंद्रांचा एक फोटो घराघरांमध्ये देण्याचे नियोजन असल्याचेही स्थानिक संयोजकांकडून सांगण्यात आले.

COMMENTS