नवी दिल्ली ः नुकत्याच झालेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या पॅनेलला बहुमत मिळाले होते, त्यानंतर भारतीय
नवी दिल्ली ः नुकत्याच झालेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या पॅनेलला बहुमत मिळाले होते, त्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड झाली होती. त्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने आपण कुस्तीतून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते, तर बजरंग पुनियाने आपला पद्मश्री परत केला होता, यानंतर अखेर रविवारी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. संजय सिंह यांचेही निलंबन करण्यात आले आहे.
संजय सिंह यांनी अध्यक्षपदी निवड होताच नंदिनी नगर, गोंडा येथे अंडर 15 आणि अंडर 20 खेळाडूंची स्पर्धा घोषित केली होती. यावरून कुस्तीपटू साक्षी मलिकनेही जाहीर टीका केली होती. त्यानंतर, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने संजय सिंग यांच्या अध्यक्षतेखाली असलेली कमिटीच निलंबित केली. गेल्या 11 महिन्यांपासून वादांनी वेढलेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या नव्या संस्थेला क्रीडा मंत्रालयाने रविवारी 24 डिसेंबर रोजी निलंबित केले. 3 दिवसांपूर्वी 21 डिसेंबर रोजी कुस्ती महासंघाच्या निवडणुका झाल्या, ज्यामध्ये भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह नवीन अध्यक्ष झाले होते. नवीन अध्यक्षांच्या विजयानंतर, कुस्ती महासंघाने 28 डिसेंबरपासून उत्तर प्रदेशातील गोंडा येथे ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा केली होती. गोंडा हा भाजप खासदार बृजभूषण यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. नवीन कुस्ती महासंघाविरुद्ध क्रीडा मंत्रालयाच्या कारवाईमागे हे कारण असल्याचे मानले जात आहे. राष्ट्रीय स्पर्धांची घोषणा करणे घाईचे ठरले असल्याचे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच स्पर्धा जाहीर करताना योग्य प्रक्रिया पाळली गेली नाही, असेही क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे. नवनिर्वाचित मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार सिंह यांनी 21 डिसेंबर रोजी जाहीर केले की कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा या वर्षाच्या समाप्तीपूर्वी सुरू होतील. ही प्रक्रिया नियमांच्या विरुद्ध आहे. स्पर्धा जाहीर करताना खेळाडूंना किमान 15 दिवसांचा अवधी देणे गरजेचे आहे, असे क्रीडा मंत्रालयाने म्हटले.
कुस्तीपटू करणार पुनर्विचार – क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयावर साक्षी मलिकची आई कृष्णा मलिक यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या माझी मुलगी कुस्तीतून निवृत्ती घेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करेल. याशिवाय कुस्तीपटू बजरंग पुनिया, ज्यांनी पंतप्रधानांच्या घराबाहेर पद्मश्री पुरस्कार ठेवला होता, त्यांनीही हा सन्मान परत घेणार असल्याचे म्हटले आहे. ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकने बृजभूषण यांच्या जवळच्या मित्राच्या विजयाच्या निषेधार्थ कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. कुस्तीपटू बजरंग पुनियानेही पद्मश्री परत केला होता. यानंतर गुंगा पहिलवाननेही पद्मश्री परत करण्याची घोषणाही केली होती.
COMMENTS