राज्यपाल कार्यालयाला सापडली 12 आमदारांची यादी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यपाल कार्यालयाला सापडली 12 आमदारांची यादी

राज्य सरकारने शिफारस केलेल्या राज्यपालनियुक्त विधान परिषदेच्या 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडेच असल्याचे उघड झाले आहे.

अ‍ॅड. आंबेडकर अकोल्यातून लढणार लोकसभा निवडणूक
डोळ्यात मिरचीपूड टाकली आणि केले हे कृत्य | LOK News 24
Video : अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो

मुंबई / प्रतिनिधी : राज्य सरकारने शिफारस केलेल्या राज्यपालनियुक्त विधान परिषदेच्या 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडेच असल्याचे उघड झाले आहे. राज्यपालांच्या उपसचिव प्राची जांभेकर यांच्या उपस्थितीत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या अपिलावर सुनावणी झाली. त्यात ही यादी राज्यपालांकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने राज्यपालनियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी सहा नोव्हेंबर 2020 रोजी कोश्यारी यांना सादर केली होती. ही यादी राज्यपालांना सुपूर्द करून आता सात महिने उलटले, तरीही त्यांनी अद्याप नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण झाला आहे. त्यानंतर या 12 सदस्यांच्या नावांची यादी राज्यपालांकडे नसल्याची धक्कादायक माहिती गलगली यांना माहिती अधिकारात देण्यात आली होती. यादी राज्यपालांकडे नाही तर नेमकी कोणाकडे आहे, असा सवाल करत गलगली यांनी आव्हान दिले होतं. त्यावर आज राजभवन सचिवालयात उपसचिव प्राची जांभेकर यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. या सुनावणीत संबंधित यादी राज्यपालांनी स्वतःकडे ठेवल्याचे सांगण्यात आले. आता राज्यपालांनी निर्णय घेतल्यावरच माहिती मिळू शकणार आहे. राज्यपालांकडे यादी आहे आणि निर्णय झाल्यावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने माहिती द्यावी किंवा नाही? याबाबत सल्लामसलत केला जाईल, असे जांभेकर यांनी सांगितले.

COMMENTS