पढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

पढेगावला आमदार काळेंच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान

कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.

नगर अर्बन बँक शेवगाव शाखेचे व्यवस्थापक यांनी केली आत्महत्या
कोल्हे सहकारी कामगार पतपेढीला 46 लाख रूपयांचा नफा
लाडक्या बहिणींचे पैसे कर्ज खात्यात जमा करू नका

कोपरगाव प्रतिनिधी :कोरोनाच्या महामारीत आणि कडक टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले होते.अशावेळी कोरोना संक्रमणाची भिती न बाळगता  स्वतः ची कुटुंबाची काळजी घेत नागरीकांना उत्कृष्ट सुखसोयी पुरविणाऱ्या कर्मचारी वर्गास आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून सरपंचांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
       पढेगावचे सरपंच ,पोलिस पाटील,आरोग्य विभाग कर्मचारी,रेशन दुकानदार,पत्रकार,वायरमन,मेडीकल,डॉक्टर ,ग्रामपंचायत कर्मचारी आदींचा सन्मानपत्र ,गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी प्रकाश शिंदे ,उत्तमराव चरमळ,लक्ष्मण मलिक,बाबासाहेब शिंदे,रामकृष्ण लंके,शरद लाड,सुजाता भिंगारदिवे,आरोग्यसेवक बनसोडे,कावेरी वाघ,मिराताई कदम ,वनिता वाणी,मिनाताई वाघ,ग्रामसेवक योगेश देशमुख आदी उपस्थित होते.

COMMENTS