Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लॅप्रोस्कोपी व हिस्ट्रोस्कोपी हॅण्डस ऑन ट्रेनिंगसाठी थेट परदेशातून प्रशिक्षणासाठी डॉक्टर्स नाशिकमध्ये दाखल

डॉ. बांगर्स स्पर्श वूमन हॉस्पिटलला ॲडव्हान्स हिस्ट्रोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपिक सेंटरला हॅण्डस ऑन ट्रेनिंग सेंटरचाही दर्जा

नाशिक – मेडिकल टुरिझमला चालना देतांना महाराष्ट्रातील पहिले ऑपरेटीव्ह हिस्ट्रोस्कोपी हॅण्डस ऑन ट्रेनिंग आणि उत्तर महाराष्ट्रातील पहिले लॅप्रोस्कोप

रिचा चड्ढाकडून भारतीय सेनेचा अपमान; ट्विटरवर संताप व्यक्त
लहान मुलांचा शोषण केल्या प्रकरणी आमदार नारायण कुचे व भाजप कार्यकर्त्यावर कारवाई करण्याची मागणी 
मंगळवेढा तालुक्यात विषबाधा; दोन लहान मुलींचा मृत्यू

नाशिक – मेडिकल टुरिझमला चालना देतांना महाराष्ट्रातील पहिले ऑपरेटीव्ह हिस्ट्रोस्कोपी हॅण्डस ऑन ट्रेनिंग आणि उत्तर महाराष्ट्रातील पहिले लॅप्रोस्कोपी हॅण्ड ऑन ट्रेनिंग देणारे सेंटर नाशिकमध्ये कार्यान्‍वित झालेले आहे. या सेंटरद्वारे पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिली जात असून नुकताच थेट उत्तर आफ्रिकातील प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर यांनी डॉ.एच. वाय. बांगर यांच्‍या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पूर्ण केले. मिळालेले आधुनिक ज्ञान, प्रशिक्षण तसेच झालेले आदरातीर्थ्य यामुळे भारावलो असल्‍याची भावना या प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांनी व्‍यक्‍त केली आहे.

एमबीबीएस, एमडी, एमएस यांसारखे पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना हॅण्डस ऑन ट्रेनिंग आवश्यकता असते. वैद्यकीय अभ्यासक्रम पुर्ण करीत असताना ज्या अद्ययावत गोष्टींचे ज्ञान वैद्यकीय महाविद्यालयांत मिळत नाही, ते प्राप्त करण्यासाठी फेलोशिप गरजेची ठरते. जर्मनी येथून डॉ. एच. वाय बांगर यांनी लॅप्रोस्कोपीमधील आपले अॅडव्हान्स शिक्षण पूर्ण केले आहे. नाशिकमधील नामांकीत लॅप्रोस्कोपी सर्जन म्हणून त्‍यांची ख्याती असून, त्यांनी आतापर्यंत दुर्बिणीद्वारे १० हजारांहून अधिक पोटाच्या आतील शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कोपी) तसेच गर्भपिशवीच्या आतील शस्त्रक्रिया (हिस्ट्रोस्कोपी) केल्या आहेत. तब्बल १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, अत्याधुनिक यंत्रसामग्री, नवीन तत्रंज्ञान, आधुनिक उपकरणांची उपलब्धता हे डॉ.बांगर यांच्या राणेनगर येथील अॅडव्हान्स लॅप्रोस्कोपी सेंटरचे बलस्थान आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून हॅण्डस ऑन ट्रेनिंग मिळावी, याकरीता एमबीबीएस, एमडी, एमएससारखे पदव्युत्तर वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण करणारे विद्यार्थी संपर्क साधत आहेत. विद्यार्थ्यांना अद्ययावत प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बांगर यांनी हॅण्डस ऑन ट्रेनिंग सेंटर कार्यान्वित केले आहे. एमडी, एमएस पूर्ण केलेले तीन विद्यार्थी सध्या डॉ. बांगर यांच्याकडे हॅण्डस ऑन ट्रेनिंग घेत आहेत. त्यापैकी अल्जेरिया येथील चाबी ओवांलियो चेरिफ आणि रबिया माया तसेच आंध्र प्रदेशातील सराण्या नायडू या विद्यार्थिनीने हॅण्डस ऑन ट्रेनिंग पूर्ण केल्‍यानंतर, ते मायदेशी परतले.

विशेष म्हणजे या फेलोशिपमध्ये प्रत्यक्ष रुग्णांना उपचार देण्याची संधी (हॅन्ड ऑन ट्रेनिंग) उपलब्ध करून दिली जाते. डॉ. बांगर स्वत: थांबून उपचारावेळी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यामूळे उपचारांबाबतचे कौशल्य अचूकरित्या अवगत करणे या विद्यार्थ्यांना शक्य होते आहे. विशेष म्हणजे हॅन्डस ऑन ट्रेनिंग घेतल्याने  विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासही मदत होते आहे. केवळ रुग्णांना सर्वोत्तम उपचार सेवा देण्यावरच कार्य न थांबविता प्रशिक्षित डॉक्टरांची नवी पिढी घडविण्याचे महत्वपूर्ण कार्य डॉ. बांगर यांनी या माध्यमातून सुरू केले आहे. रुग्णांचा वाढता ओघ आणि एकावेळी केवळ तीनच विद्यार्थ्यांना हॅण्डस ऑन ट्रेनिंगसाठी प्रवेश दिला जात असल्याने त्यांना शिकण्याची भरपूर संधी उपलब्ध होते आहे. अॅडव्हान्स प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा या हॅण्डस ऑन ट्रेनिंग सेंटरचा उद्देश असल्याची माहिती डॉ. बांगर यांनी दिली आहे.

पुर्वीच्या काळात पोट उघडून शस्त्रक्रिया केल्या जात होत्‍या. यूरोपात १९९६ मध्येच टाक्याच्या शस्त्रक्रिया बंद झालेल्‍या आहेत. आपल्याकडेही लॅप्रोस्कोपीचे महत्व वाढत असून त्याचे फायदेही रुग्णांच्या लक्षात येत आहेत. शस्त्रक्रियेमुळे होणाऱ्या वेदना कमी होत असून जखमा भरुन यायलाही वेळ लागत नाही. लॅप्रोस्कोपीमुळे रुग्णाचा रुग्णालयातील मुक्कामही कमी झाला असून रुग्ण लवकर घरी जाऊ शकतो. तसेच दैनंदिन कामेही काही दिवसांतच सुरू करू शकतो अशी माहिती डॉ. एच. वाय. बांगर व डॉ.अनिता बांगर यांनी दिली.

COMMENTS