Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिद्धटेक ग्रामपंचायतीत सत्तांतर

भाजपच्या लताबाई सांगळे यांची बिनविरोध निवड

कर्जत : कर्जत तालुक्यातील सिद्धटेक ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी आज निवडणूक झाली. यामध्ये लताबाई सोमनाथ सांगळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रा

तू फक्त नगरला ये, तुझा दरबार उधळून लावू
कोपरगाव शिवसेनेकडून तिथीप्रमाणे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा
नगर-मनमाड रस्त्यावर प्रकटले यमराज व चित्रगुप्त

कर्जत : कर्जत तालुक्यातील सिद्धटेक ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी आज निवडणूक झाली. यामध्ये लताबाई सोमनाथ सांगळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायतीतील एक सदस्य अपात्र ठरल्याने खूप दिवसांपासून सरपंचपद रिक्त होते. मध्यंतरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी उपसरपंच यांच्यावर अविश्‍वास आणत त्यांना पदच्चुत केले होते. तेव्हापासून सर्वांनी भाजपा आणि आ. प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला होता. आज झालेल्या निवडीमध्ये सरपंच पदासाठी अर्ज लताबाई सोमनाथ सांगळे यांचा एकमेव दाखल झाला होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र बेलेकर यांनी लताबाई सांगळे यांच्या नावाची सरपंच म्हणून निवड जाहीर केली. यावेळी ग्रामसेवक श्याम भोसले हे हजर होते. त्यांना सर्व सदस्यांनी एकमताने साथ दिली यामध्ये ग्रामपंचायत सदस्य रमेश विठ्ठल पवार, पोपट वामन मोरे, सुभाबाई नागनाथ जाधव, रेश्मा अमित खोमणे, उज्वला मच्छिंद्र बनकर, गणेश रामचंद्र भोसले, सखाराम महादेव तांदळे, अभिजीत रामभाऊ मांढरे हे सर्व सदस्य निवडी वेळी हजर होते. यावेळी नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार करण्यात आला. गुलाल व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सरपंच लताताई सांगळे यांनी यापुढे आ. प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आणि विचार विनिमयातून परिसराच्या विकासाचा अनुशेष भरून काढू असा विश्‍वास व्यक्त केला. या निवडीबद्दल त्यांचे परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे. आ. प्रा. राम शिदे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी त्यांचे दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले. या निवडीसाठी भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते सारंग रोहिदास नलगे, रमेश पवार, चिंतामण दादाराव सांगळे, बंडा मोरे, निरंजन देव, नागनाथ जाधव, युवा नेते सचिन बनकर तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते, युवक, महिला कार्यकर्त्यानी जोरदार मोर्चेबांधणी केली होती.

COMMENTS