Homeताज्या बातम्यामनोरंजन

दिग्गज अभिनेत्री तनुजा यांची प्रकृती बिघडली

मुंबई प्रतिनिधी - फिल्म इंडस्ट्रीत दररोज कोणीतरी आजारी पडल्याच्या किंवा मृत्यूच्या बातम्या येतात. यामुळे चित्रपटसृष्टीच नव्हे तर चाहतेही दुःखी

 छत्रपती संभाजी नगरचे मुख्य रस्ते बनली सेल्फी पॉईंट
रणबीरच्या ‘एनिमल’ चा टीझर रिलीज
भारतीय संघासाठी खूशखबर; टी २० वर्ल्डकपमध्ये थेट ‘एन्ट्री’

मुंबई प्रतिनिधी – फिल्म इंडस्ट्रीत दररोज कोणीतरी आजारी पडल्याच्या किंवा मृत्यूच्या बातम्या येतात. यामुळे चित्रपटसृष्टीच नव्हे तर चाहतेही दुःखी आहेत. दरम्यान, आता आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा समर्थ आणि काजोलच्या आईची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. अभिनेत्री लवकर बरी व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. अभिनेत्रीवर उपचार सुरू आहेत. रविवारी त्यांना दम्याशी संबंधित त्रास झाला ज्यामुळे जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनेत्री 80 वर्षांची आहे. चाहत्यांना अभिनेत्रीची तब्बेत बिघडल्याची माहिती मिळाल्यानंतर ते सर्व तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करू लागले तनुजा समर्थ यांनी अनेक हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. चाहत्यांना अभिनेत्रीचा अभिनय खूप आवडतो. तनुजा समर्थ या चित्रपट निर्माते कुमारसेन समर्थ आणि अभिनेत्री शोभना समर्थ यांच्या कन्या आहेत. तिला अभिनेत्री नूतनसह तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. तनुजा यांनी 1973 मध्ये चित्रपट निर्माता शोमू मुखर्जी यांच्याशी लग्न केले आणि त्यांना काजोल आणि तनिषा या अभिनेत्री या दोन मुली आहेत. त्याचवेळी, आता अभिनेत्री वयाशी संबंधित समस्यांना तोंड देत आहे.

COMMENTS