Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर शर्मिला ठाकरे यांची प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी - दिशा सालियान मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक अर्थात एसआयटीद्वारे चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

शर्मिला ठाकरे यांनी केले एन्काउंटरचे समर्थन
राजकारणातील एक वर्तुळ पूर्ण झाले
 मी पूर्ण कपड्यात फिरते बाकीच्यांचे मला माहित नाही  – शर्मिला ठाकरे

मुंबई प्रतिनिधी – दिशा सालियान मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक अर्थात एसआयटीद्वारे चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केली. यानंतर सरकारने याबाबत एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून या एसआयटी चौकशीला विरोध करण्यात आला आहे. विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी सरकारतर्फे जाणूनबुजून या प्रकरणात संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या निर्णयबाबत आता राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसेतर्फे आयोजित केलेल्या एका रोजगार मेळाव्याला उपस्थित राहिल्या असताना माध्यमांनी या प्रकरणी त्यांना प्रश्न विचारला होता.

आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियान मृत्यू प्रकरणी काही आरोप झाले असून राज्य सरकारने त्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही एकाच कुटुंबातील आहात, त्यामुळे याबद्दल तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न शर्मिला ठाकरे यांना विचारला असता त्या म्हणाल्या, आदित्य असे काही करेल, असे मला वाटत नाही. चौकशा कुणीही कुणाच्या लावू शकतो. आम्ही पण याच्यातून खूप गेलो आहोत.” रोजगार मेळाव्यासंबंधी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “आपल्या देशातील लोकसंख्येपैकी जवळपास ६० टक्के तरुण आहे. त्यांच्या हाताला काम देणे आवश्यक आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडे एवढ्या नोकऱ्या उपलब्ध नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारच्या खूप साऱ्या योजना आहेत, ज्या तरुणांपर्यंत पोहोचत नाहीत. अशा योजना पोहोचवण्याचे काम आमचे मनसे पदाधिकारी करत आहेत. त्या कामाला प्रोत्साहन देण्याा आमचा प्रयत्न आहे. उद्योग छोटा असो किंवा मोठा पण तरुणांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे महत्त्वाचे आहे.”

COMMENTS