Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सेन्सेक्सने ओलांडली 70 हजारांची पातळी

मुंबई ः शेअर बाजाराने सोमवारी प्रचंड उसळी घेतली आहे. सेन्सेक्सने प्रथमच 70 हजारांची पातळी ओलांडली असून, बाजाराला नव्या शिखरावर नेले आहे. बाजाराने

खंबाटकी घाटातील नवा बोगदा अंतिम खुदाईद्वारे खुला करण्यास प्रारंभ; पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी होणार कमी
शिर्डी शहर शंभर टक्के सौर शहर करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज :  संचालक प्रसाद रेशमे
औदुंबर-भुवनेश्‍वरीदरम्यान होणार झुलता पूल; झुलत्या पुलामुळे पर्यटनाला चालना

मुंबई ः शेअर बाजाराने सोमवारी प्रचंड उसळी घेतली आहे. सेन्सेक्सने प्रथमच 70 हजारांची पातळी ओलांडली असून, बाजाराला नव्या शिखरावर नेले आहे. बाजाराने विक्रमी उच्चांक गाठून ऐतिहासिक वाढ दर्शवली आहे. सेन्सेक्सने 9.55 मिनिटांनी 70,048.90 ही पातळी गाठली होती.
या आठवड्यात सेन्सेक्समध्ये 70 हजारांच्याही वरची पातळी दिसण्याची शक्यता आहे. देशांतर्गत शेअर बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्सने जोरदार उसळी घेतली, पण निफ्टी सुरुवातीला लाल चिन्हात दिसत होता. त्यानंतर त्याच्यातही वाढ दिसून आली. बँक निफ्टीने जवळपास 300 अंकांच्या वाढीसह सुरुवात केली आहे. आज क्रूडच्या किमती पुन्हा स्थिर झाल्या आहेत आणि ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल 76 डॉलरच्यावर आहेत. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात करताना बीएसई सेन्सेक्स 100 अंकांच्या म्हणजेच 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 69,925 वर उघडला. व्यवहाराच्या सुरुवातीला निफ्टी नाममात्र घसरणीसह लाल रंगात उघडला. मात्र, बाजार उघडताच तो 8 अंकांच्या किंचित वाढीसह ग्रीन झोनमध्ये आला. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऑटो, फार्मा, वित्तीय सेवा आणि आरोग्य सेवा निर्देशांकांमध्ये घसरण दिसून येत आहे आणि इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढत आहेत.

COMMENTS