Homeताज्या बातम्यादेश

सनी देओल बेपत्ता? पठाणकोट मध्ये लागले पोस्टर्स

मुंबई : बॉलिवूड अभिनेते सनी देओल यांचे अनेक चाहते आहेत. गदर २ सिनेमानंतर सनी देओल यांची मोठी क्रेझ आहे. त्यांच्या आगामी अनेक सिनेमांची चर्चा असता

मोनिकाताई राजळे आमची बहिण – प्रतापकाका ढाकणे
भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या मध्य मंडळाध्यक्षपदी अशोक भोसले
एसटी कर्मचार्‍यांना न्यायालयाची चपराक; बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास स्पष्ट नकार

मुंबई : बॉलिवूड अभिनेते सनी देओल यांचे अनेक चाहते आहेत. गदर २ सिनेमानंतर सनी देओल यांची मोठी क्रेझ आहे. त्यांच्या आगामी अनेक सिनेमांची चर्चा असताना पंजाबमध्ये ते बेपत्ता असल्याचं पोस्टर लावण्यात आले आहेत. इतकंच नाही, तर सनी देओल यांना शोधून आणणाऱ्याला ५० हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे. काय आहे नेमकां प्रकार सनी देओल यांचे पोस्टर लावण्यात आल्याची ही पहिलीच वेळ नाही. सनी देओल गुरदासपूर – पठाणकोट लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते खासदार झाल्यानंतर त्यांनी कधीही दोन्ही जिल्ह्यात भेट दिली नाही. तसंच कोणतंही विकासकार्य देखील केलेलं नाही, असा तेथील लोकांचा आरोप आहे. पठाणकोट जिल्ह्यातील हल्का भोया येथील लोकांनी सरना बस स्टँडवर सनी देओल हे बेपत्ता असल्याचे पोस्टर लावले आहेत. बस स्टँडसह अनेक ठिकाणी बेपत्ता असण्याचे पोस्टर लावत तेथील जनतेने राग व्यक्त केला आहे. याआधीही सनी देओल यांच्याविरोधात हल्का पठाणकोट आणि सुजानपूरमध्ये बेपत्ता असल्याचे पोस्टर लावले होते. पण त्यानंतर भाजप खासदार सनी देओल यांनी लोकांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्यांनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात खासगार झाल्यापासून कधीही भेट दिली नाही.

COMMENTS