Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेटीएमचा शेअर 20 टक्क्यांनी कोसळला

मुंबई : शेअर बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार दिसून येत आहे. यासोबतच पेटीएमच्या वन 97 कम्युनिकेशनच्या शेअरने आपले धक्कातंत्र सुरूच ठेव

कोरोना संकटात ही राज्यासह तालुक्यात विकास कामांचा वेग कायम – नामदार थोरात
इथेनॉलमधील 75 टक्के हिस्सा शेतकर्‍यांना द्या : माजी खा. राजू शेट्टी यांचा कारखानदारांना इशारा
रोटरी क्लब अकोलेकडून मदतीचा हात

मुंबई : शेअर बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार दिसून येत आहे. यासोबतच पेटीएमच्या वन 97 कम्युनिकेशनच्या शेअरने आपले धक्कातंत्र सुरूच ठेवले आहे. कंपनीचा शेअर गुरूवारी सकाळपासून तब्बल 20 टक्क्यांनी घसरला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने कर्ज पुरवठ्याच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयाचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.
पेटीएमचा शेअर बुधवारी 813.30 रुपयांवर बंद झाला होता. गुरूवारी सकाळी व्यवहार सुरू झाल्यापासूनच शेअरमध्ये घसरण झाली आणि एका क्षणी हा शेअर 20 टक्क्यांनी खाली आला. त्यानंतर तो थोडा सावरला असला तरी आताही तो जवळपास 18 टक्क्यांनी घसरून ट्रेड करत आहे. पेटीएमचा 52 आठवड्यांचा उच्चांक 998.30 रुपये आहे. बँका व वित्तीय संस्थांच्या माध्यमातून पुरवली जाणारी असुरक्षित कर्जे प्रमाणाबाहेर वाढल्यानं रिझर्व्ह बँकेनं या संदर्भातील नियम कठोर केले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर पेटीएमनं आपल्या छोट्या व असुरक्षित कर्जाच्या पुरवठ्यात कपात करण्याचा आणि ’बाय नाउ, पे लेटर’ या योजनेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारात दिसत आहे. या निर्णयामुळं कंपनीचा अंदाजित महसूल आणखी खाली येईल, अशी भीती ब्रोकरेज फर्मना वाटत आहे. पेटीएमने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काळात कंपनी 50 हजार रुपयांच्या खालील रकमेच्या असुरक्षित कर्जाचे प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी करणार आहे. त्यामुळं पेटीएमचं पोस्ट पेड योजनेअंतर्गत दिलं जाणारं कर्ज निम्म्यावर येण्याची शक्यता आहे. त्याचा नफा किंवा कमाईवर फारसा परिणाम होणार नाही, असं तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, आज तरी बाजारात साशंकतेचे वातावरण आहे. ब्रोकरेज फर्म जेफरीजच्या माहितीनुसार, पेटीएमने आपल्या ’आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’ व्यवसायाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, आरबीआयच्या निर्बंधांनंतर कर्ज पुरवठा करणार्‍या भागीदारांनी माघार घेतली आहे.

COMMENTS